shambhuraje desai criticize ajit pawar | राज्यात एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे ठाकरे गटाचे नेते शिंदे गटातील नेत्यांवर सतत टीका करताना दिसून येतात. तसेच इतर नेतेही एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत जाणाऱ्या आमदारांना गद्दार म्हणताना दिसत असतात. अशात अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. आता त्याला शिंदे गटाने उत्तर दिले आहे.
आता शिंदे गटातील नेते शंभुराजे देसाई यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना धारेवर धरले आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी कोणीही विसरु शकत नाही. तो तीन वर्षांपूर्वी झाला होता. पण आताही तो सर्वांना लक्षात आहे.
आता पुन्हा एकदा पहाटेचा शपथविधी चर्चेत आला आहे. अजित पवारांच्या बंडखोरीवरुन शंभुराजे देसाई यांनी थेट प्रश्न विचारला आहे. पहाटेची शपथ घेताना शरद पवारांना विचारलं होतं का? असा खोचक सवाल शंभुराजे देसाई यांनी अजित पवारांना केला आहे.
अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत ४८ तासांच सरकार स्थापन केलं होतं. ती बेईमानी नव्हती का? त्यामुळे यापुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेली टीका सहन केली जाणार नाही, असा इशारा शंभुराजे देसाई यांनी अजित पवार यांना दिला आहे.
मंत्री शंभुराजे देसाई आज पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला होता. संवाद साधताना त्यांनी अजित पवारांच्या टीकेला उत्तर देत त्यांच्यावर टीका केली आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. पक्ष सोडणं हे गैर नाही, पण घर उद्ध्वस्त करणं ही बेईमानी आहे, असे म्हणत अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे कान टोचले होते. राष्ट्रवादी मंथन वेद भविष्याचा या कार्यक्रमात त्यांनी टीका केली होती.
महत्वाच्या बातम्या-
८ जवान सुरक्षेसाठी तैनात तरीही अमृतसरमध्ये शिवसेना नेत्यावर गोळीबार, वाचा नेमकं काय घडलं?
गुंतवणूकदार मालामाल! २० रुपयांचा शेअर गेला थेट १३९० रुपयांवर, १ लाखांचे झाले ७० लाख
Virat Kohli: भारतीय संघात निवड न झाल्याने रात्रभर रडत बसला होता विराट, किस्सा वाचून भावूक व्हाल