सर्वात लोकप्रिय असलेली टी-२० लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग (IPL) आपल्या १५ व्या हंगामाकडे (15Tth Season) कूच करत आहे. दरम्यान आयपीएल २०२२ च्या आगामी हंगामासाठी खेळाडूंची लिलाव यादी जाहीर करण्यात आली आहे. आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये (लिलाव) १० संघ सहभागी झाले होते.
या मेगा ऑक्शनमध्ये एकूण ५९० खेळाडूंवर बोली लावली गेली. यापैकी ३२० भारतीय आणि २७० विदेशी खेळाडू होते. २००८ मध्ये सुरु झालेल्या आयपीएलचा यावेळी १५वा हंगाम खेळला जाणार आहे. तसेच आयपीएलच्या या लिलावामध्ये आतापर्यंत अनेक खेळाडूंना प्रचंड पैसा मिळाला आहे.
मात्र काही खेळाडूंना या लिलावात कोणताही खरेदीदार मिळाला नाही. या यादीत काही दिग्गज खेळाडू देखील आहेत. सर्वात धक्कादायक म्हणजे बांगलादेशचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शाकिब अल या खेळाडूला आयपीएलच्या लिलावात कोणत्याही संघाने खरेदी केले नाही.
शाकिब अल हसनला कोणत्याही संघाने विकत का घेतलं नाही? असा सवाल सध्या उपस्थित झाला आहे. अशातच शाकिब अल त्याच्या पत्नीने आयपीएलच्या लिलावात शाकिब अल हसनला न घेण्यामागचे कारण सांगितले आहे. याबाबत तिने एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. सध्या ही पोस्ट सोधल मिडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे.
पोस्टमध्ये शाकिब अल हसनची पत्नी उम्मी अल हसन म्हणतीये, ‘लिलावाच्या आधी अनेक संघांनी थेट संपर्क साधत तुम्ही संपूर्ण सीझनसाठी उपलब्ध आहात का विचारणा केली होती. मात्र दुर्दैवाने तसं होऊ शकलं नाही, कारण श्रीलंकेविरोधात मालिका होणार आहे. त्यामुळेच त्याला कोणत्याही संघाने खरेदी केलं नाही.’
तसेच पुढे तिने फेसबुक पोस्टमध्ये लिहिल आहे की, ‘विकत घेतल्यास त्याला श्रीलंका मालिक सोडावी लागली असती, त्यामुळे जर त्याची निवड झाली असती तरी तुम्ही असंच म्हणाला असता का? की आतापर्यंत देशद्रोही ठरवलं असतं? असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे. याचबरोबर लिलावात खरेदी न केलं जाणं काही मोठी गोष्ट नाही. हा काही शेवट नाही, नेहमी पुढचं वर्ष असतं.’
महत्त्वाच्या बातम्या
फार्मासिस्ट मेडिकलमध्येच बॉटलमधील दारू प्यायला; कोमात गेला, तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीने उडाली खळबळ
गावचा गाडा हाकताना संसाराचा गाडा झाला सुरू; सरपंचासोबत उपसरपंच अडकले विवाहबंधनात, वाचा इंटरेस्टिंग स्टोरी
महेश मांजरेकरांना किस करण्यासापूर्वी अभिनेत्री म्हणाली, त्यांना सांगा आधी पाचवेळा हात धुवून या; वाचा काय आहे किस्सा
बिनबुडाचे आरोप करुन पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि पीएसएलची बदनाम करु नको; आफ्रिदी फॉकनरवर संतापला