Share

“अनेक संघांनी संपर्क केला, मात्र…”, शाकिबला कोणीही विकत न घेतल्यामागचे पत्नीने सांगितले ‘कारण’

shakib al hasans

सर्वात लोकप्रिय असलेली टी-२० लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग (IPL) आपल्या १५ व्या हंगामाकडे (15Tth Season) कूच करत आहे. दरम्यान आयपीएल २०२२ च्या आगामी हंगामासाठी खेळाडूंची लिलाव यादी जाहीर करण्यात आली आहे. आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये (लिलाव) १० संघ सहभागी झाले होते. (shakib al hasans wife facebook post)

या मेगा ऑक्शनमध्ये एकूण ५९० खेळाडूंवर बोली लावली गेली. यापैकी ३२० भारतीय आणि २७० विदेशी खेळाडू होते. २००८ मध्ये सुरु झालेल्या आयपीएलचा यावेळी १५वा हंगाम खेळला जाणार आहे. तसेच आयपीएलच्या या लिलावामध्ये आतापर्यंत अनेक खेळाडूंना प्रचंड पैसा मिळाला आहे.

मात्र काही खेळाडूंना या लिलावात कोणताही खरेदीदार मिळाला नाही. या यादीत काही दिग्गज खेळाडू देखील आहेत. सर्वात धक्कादायक म्हणजे बांगलादेशचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शाकिब अल या खेळाडूला आयपीएलच्या लिलावात कोणत्याही संघाने खरेदी केले नाही.

शाकिब अल हसनला कोणत्याही संघाने विकत का घेतलं नाही? असा सवाल सध्या उपस्थित झाला आहे. अशातच शाकिब अल त्याच्या पत्नीने आयपीएलच्या लिलावात शाकिब अल हसनला न घेण्यामागचे कारण सांगितले आहे. याबाबत तिने एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. सध्या ही पोस्ट सोधल मिडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे.

पोस्टमध्ये शाकिब अल हसनची पत्नी उम्मी अल हसन म्हणतीये, ‘लिलावाच्या आधी अनेक संघांनी थेट संपर्क साधत तुम्ही संपूर्ण सीझनसाठी उपलब्ध आहात का विचारणा केली होती. मात्र दुर्दैवाने तसं होऊ शकलं नाही, कारण श्रीलंकेविरोधात मालिका होणार आहे. त्यामुळेच त्याला कोणत्याही संघाने खरेदी केलं नाही.’

तसेच पुढे तिने फेसबुक पोस्टमध्ये लिहिल आहे की, ‘विकत घेतल्यास त्याला श्रीलंका मालिक सोडावी लागली असती, त्यामुळे जर त्याची निवड झाली असती तरी तुम्ही असंच म्हणाला असता का? की आतापर्यंत देशद्रोही ठरवलं असतं? असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे. याचबरोबर लिलावात खरेदी न केलं जाणं काही मोठी गोष्ट नाही. हा काही शेवट नाही, नेहमी पुढचं वर्ष असतं.’

महत्त्वाच्या बातम्या
भाजपच्या ‘त्या’ २ डझन नेत्यांना मिळणार VIP सुरक्षा; मोदी सरकारने केली मोठी घोषणा
जिंकण्यासाठी कायपण! माजी आमदार म्हणाला, दारु वाटा, पैसे वाटा नाहीतर दंगली करा, पण निवडणुक जिंका
चला बसुया! पुरुषांपेक्षा महिलाच जास्त म्हणताय, दारु पिण्याऱ्यांची ‘ही’ आकडेवारी बघून बसेल धक्का
कारमध्ये नग्न अवस्थेत आढळलेल्या जोडप्याच्या मृत्युचे कारण आले समोर, वाचून धक्का बसेल

आंतरराष्ट्रीय इतर खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now