Share

तारक मेहता शो सोडलेले शैलेश लोढा एका एपिसोडसाठी घ्यायचे ‘एवढे’ मानधन, वाचून धक्का बसेल

तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या शोमधून एकामागून एक महत्त्वाचे कलाकार निघून जात आहेत. दिशा वाकानी (Disha Vakani) गेल्या अनेक वर्षांपासून शोमध्ये दिसली नाही, तर बावरी, रोशन सिंग सोधी, अंजली मेहता यांसारख्या पात्रांमध्ये नवीन चेहरेही दिसत आहेत. या शोमध्ये अनेक नवीन चेहरे आल्यानंतर शोच्या टीआरपीमध्ये फरक झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे.(Taarak Mehta Ka Ooltah Chashmah,Disha Vakani)

आता तारक मेहताची भूमिका साकारणाऱ्या शैलेश लोढा यांनीही या शोला अलविदा करत करिअरची नवी इनिंग सुरू केल्याचे वृत्त आहे. पण तारक मेहता का उल्टा चष्माच्या एका एपिसोडसाठी शैलेश लोढा किती पैसे घेत होते हे तुम्हाला माहिती आहे का. शैलेश लोढा हे या शोचे महत्त्वाचे कलाकार आहेत, ते शोमध्ये केवळ शीर्षक भूमिकाच करत नव्हते तर ते प्रसिद्ध कवी देखील आहेत. यामुळेच शोमध्ये त्यांना खूप चांगले पॅकेज दिले जात होते.

शैलेश लोढा यांच्या एका एपिसोडच्या फीबद्दल बोलायचे झाले तर ते एक लाख रुपये घेत होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते शोमधील तिसरा सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता होता. या शोमध्ये दिलीप जोशी जेठालालची भूमिका साकारत आहेत आणि दिशा वाकाणी या शोमध्ये दयाबेनची भूमिका साकारत आहेत, त्यानंतर शैलेश लोढा यांची महत्वपूर्ण भूमिका आहे.

शैलेश लोढा यांनी हा शो का सोडला, हे सध्या स्पष्ट झालेले नाही कारण निर्मात्यांनी आणि शैलेश लोढा यांच्यासारखे कोणतेही अधिकृत विधान जाहीर केले नाही. पण शैलेश त्याच्या नव्या करारावर फारसा खूश नव्हता असे मानले जाते. त्यामुळे त्याने शूटिंगला येणे बंद केले आणि शोला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. तो एका नवीन शोमध्ये सहभागी होणार असल्याची बातमी आहे ज्यासाठी त्याने शूटिंग देखील सुरू केले आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोने तब्बल १४ वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आजही घरा-घरात हा शो एकत्र बसून पाहायला जातो. त्यामुळे या शोला घेऊन चाहत्यांच्या भावना जोडलेल्या आहेत. त्यामध्ये अशी एखादी न्यूज आली की प्रेक्षकही दुखी होतात. मात्र जोपर्यंत शैलेश लोढा किंवा शोचे निर्माते असिद मोदी स्पष्ट काही सांगत नाही तोपर्यंत चाहत्यांनी काळजी करू नये.

महत्वाच्या बातम्या-
तारक मेहता यांनी खरंच शो सोडला का? अखेर निर्मात्यांनी सोडले मौन, चाहतेही झाले हैराण
तारक मेहताच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, दयाबेन नंतर हा प्रसिद्ध अभिनेताही सोडणार शो?
तारक मेहता का उल्टा चश्मा शोमध्ये असं काय घडलं की संपूर्ण टीमला मागावी लागली माफी?
तारक मेहतामध्ये दयाबेन न येण्याचं खरं कारण आलं समोर, स्वत: जेठालालने केला मोठा खुलासा

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now