बॉलिवूडचा किंग शाहरूख खानचा (Shahrukh Khan) आगामी ‘पठाण’ (Pathan) हा चित्रपट दीर्घकाळापासून चर्चेत आहे. दीर्घकाळानंतर शाहरूख या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पुनरागमन करत आहे. त्यामुळे त्याच्या चाहते शाहरूखला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. यादरम्यान आता अशी बातमी समोर येत आहे की, शाहरूखचा हा चित्रपट युट्यूबवर लीक झाला आहे. सध्या यासंबंधित एक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
राजेश साहू नावाच्या एका ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये ‘पठाण’ (Pathan) चित्रपटाची लिंक म्हणत एका व्हिडिओची लिंक देण्यात आली आहे. तसेच या लिंकद्वारे ‘पठाण’ चित्रपट पैसे खर्च न करता पाहता येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
पोस्टमध्ये लिहिलेले आहे की, ‘दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं म्हणणं बरोबर वाटलं. ‘पठाण’ (Pathan) चित्रपटाची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून लोक याद्वारे चित्रपट पाहू शकतील आणि कोणालाही सिनेमागृहात जाऊन २००-३०० रूपयांची तिकिट खरेदी करण्यासाठी पैसे खर्च करावे लागणार नाही.
https://twitter.com/RajeshSahu7994/status/1508767339512172544?s=20&t=N9DWlQ4EfKxuZXaICnwjrA
यासोबतच इतर अनेक सोशल मीडिया यूजर्स ही लिंक शेअर करत आहेत. तर लल्लन टॉपद्वारे या व्हायरल पोस्ट आणि दिलेल्या लिंकमागील सत्यतेची पडताळणी करण्यात आली. तर या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की, सोशल मीडियावर केला जाणार दावा खोटा आहे. तसेच व्हायरल होणारी लिंकसुद्धा ‘पठाण’ चित्रपटासंबंधित नाही.
रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की, ‘व्हायरल होणारी लिंक २८ नोव्हेंबर २०२१ रोजी शेअर पोस्ट करण्यात आलेल्या एका व्हिडिओचा आहे. हा व्हिडिओ २ तास ३८ सेकंदाचा आहे. यामध्ये ‘पठाण’ (Pathan) चित्रपटातील नाही तर शाहरूख खानच्या ‘रईस’, जॉन अब्राहमच्या ‘रॉकी हँडसम’ आणि दीपिका पादुकोणच्या एका चित्रपटातील सीन्सचा समावेश आहे.
तसेच व्हिडिओत पुढे शाहरूखचा मुलगा आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणासंबंधीत, शाहरूखचा ‘झीरो’ चित्रपट, ‘पठाण’ (Pathan) चित्रपटाला संगीत देणारे संगीतकार जोडी विशाल-शेखर आणि चित्रपटाचे निर्माते आदित्य चोप्रा यांचा उल्लेख करण्यात आला आहे. शिवाय सुरक्षिततेची काळजी घेता ही लिंक ओपन न करण्याचे आवाहनसुद्धा रिपोर्टमध्ये करण्यात आले आहे.
दरम्यान, ‘पठाण’ (Pathan) हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. यामध्ये शाहरुख खान एक जासूसच्या भूमिकेत दिसणार आहे. सिद्धार्थ आनंद या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार चित्रपटाचे बजेट २०० कोटी रूपये आहे. २५ जानेवारी २०२३ रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
नवाजुद्दीन सिद्दीकीचा हटके अंदाज; लक्झरी कार सोडून केला लोकलने प्रवास, व्हिडिओ व्हायरल
चहलचा IPL मध्ये धिंगाना! बायको धनश्रीला मैदानावरच दिला किस; पहा व्हायरल व्हिडीओ
“सुख म्हणजे नक्की काय असतं” मालिकेतील अभिनेता विवाहबंधनात; ‘या’ कलाकारांची हजेरी