Share

shahrukh khan : शाहरुख खानची झालीय खूपच बिकट अवस्था; देतोय ‘या’ गंभीर आजाराशी झुंज…

shaharukh khan

shahrukh khan talk about his health |  बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. शाहरुख खान त्याच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. तो वेगवेगळ्या पद्धतीने चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. त्यासाठी तो सोशल मीडियावरही खुप ऍक्टीव्ह आहे.

अशा परिस्थितीत, शाहरुख खानने त्याच्या चाहत्यांशी संपर्क साधण्यासाठी भन्नाट आयडिया लढवली आहे. त्याने आस्क मी एनीथिंगचे एक सेशन घेतले आहे. त्यामुळे चाहत्यांना शाहरुख खानच्या आयुष्याशी संबंधित अनेक अपडेट्स मिळाले.

आस्क मी एनिथिंगमध्ये त्याला चाहते वेगवेगळे प्रश्न विचारत आहे. अशात ट्विटरवर एका चाहत्याने त्याच्या सवयींबद्दल विचारले असता, शाहरुख खानने उत्तर दिले की, आजकाल तो एका आजारामुळे त्रस्त आहे. त्यामुळे त्याला रोज दाळ आणि भात खावा लागत आहे.

तसेच पुढे शाहरुखने सांगितले की, तो लवकरच बरा होईल. पण त्यासाठी त्याला एका विशिष्ट प्रकारचा आहार घ्यावा लागणार आहे. शाहरुख खानने त्याच्या प्रकृतीबद्दल अशी माहिती दिल्यामुळे चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. अनेकांना तर शाहरुखची चिंता लागली आहे.

एका चाहत्याने म्हटले आहे की. तुमच्या आयुष्यात खुप वेगवेगळ्या गोष्टी घडत आहे. तुम्ही इव्हेंट्स, प्रमोशनमध्ये खुप व्यस्त आहात. पण आपली काळजी घ्या. जेवण वेळेत करा आणि विश्रांती घ्या. त्याचवेळी एका यूजरने लिहिले की, लवकर बरा हो तु सर्वात मजबूत पठाण आहे.

आस्क मी एनिथिंगमध्ये शाहरुख खानने त्याचे कुटुंब, फिफा विश्वचषक, आयपीएल मॅच आणि कामाबद्दल विचारलेल्या मजेदार प्रश्नांना मजेदार उत्तरे दिली. यासोबतच आणखी एक मोठे अपडेट त्याने दिले आहे. तो म्हणाला की, ‘बेशरम रंग’ नंतर पुढचे गाणे अरिजित सिंगच्या आवाजात रिलीज होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
अर्जून तेंडूलकर पेक्षाही जबरदस्त निघाला ‘हा’ खेळाडू; पदार्पणातच ठोकले द्विशतक
अवघ्या १५ धावांवर संपला आॅस्ट्रेलियाच्या संघाचा डाव; भलेभले फलंदाज वाचवू शकले नाही लाज
kiran agashe : दोन दिवसांवर साखरपूडा आला असताना बहिण-भावासोबत घडली दुर्देवी घटना, संपुर्ण गाव हादरले

ताज्या बातम्या बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now