‘मला माझ्या गुरूंचा फोन आला, ‘पुन्हा पक्षात ये,’ मनसेत होणार बड्या नेत्याची घरवापसी

काही दिवसांपूर्वी मनसेने मशिदीच्या भोंग्यांविरोधात आंदोलन जाहीर केल्यानंतर कोंढवा परिसरात हनुमान चालीसा लावू देणार नाही, असं वक्तव्य करत पुणे शहर वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष शहाबाज पंजाबी यांनी पक्षाला आव्हान दिलं होतं. याच नाराजीतून पंजाबी यांनी मनसेला रामराम ठोकला होता.

१५ दिवसांपूर्वीच शिवसेना नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत पंजाबी यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र आता पुन्हा पंजाबी यांची घरवापसी होणार असल्याची माहिती मिळत आहे. ‘मी लवकरच पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणार आहे,’ असं खुद्द पंजाबी यांनी सांगितलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 22 मे रोजी पुण्यात जाहीर सभा होणार आहे. याच सभेत पंजाबी हे पुन्हा मनसेत प्रवेश करणार असल्याच बोललं जातं आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी पत्रक काढून मनसे कार्यकर्त्यांना आणि जनतेला भोंग्यांविरोधात आंदोलन तीव्र करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

राज ठाकरेंच्या या निर्णयावरून पक्षात नाराजीचा सुर उमटला होता. याच नाराजीतून पंजाबी यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली होती. अखेर आता १५ दिवसांतच शहाबाज पंजाबी यांनी आपली भूमिका बदलत स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे. यावर माध्यमांशी बोलताना खुद्द शहाबाज पंजाबी यांनी भाष्य केलं आहे.

याबाबत बोलताना ते म्हणतात, ”आमचे काही मतभेद झाले होते. त्यामुळे मी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र आता मी पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणार आहे. मला पक्षामध्ये १६ वर्ष झाली आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी मी शिवसेनेत प्रवेश केला. भोंग्यांसंदर्भात घेतलेला निर्णय मला पटला नव्हता म्हणून मी गेलो होतो.’

दरम्यान, आता दुसरीकडे 15 दिवसांमध्येच शहाबाज पंजाबी यांनी पुन्हा मनसेत जाण्याचा निर्णय का घेतला? याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. यावर बोलताना पंजाबी म्हणतात, ‘माझ्या गुरूने सांगितलं की, बाबा हा धार्मिक विषय नाही. हा विषय सर्व समाजासाठी आहे. हे सुप्रीम कोर्टाचा आदेश आहेत. राज ठाकरे योग्य बोलत आहे.’

याबाबत बोलताना पुढे पंजाबी म्हणतात, ‘आपला पक्ष हे आपले घर आहे. १६ वर्ष घरात काम केलेलं आहे. पुन्हा पक्षात ये आणि व्यवस्थित काम कर, असं मला सांगण्यात आलं. त्यामुळे मी पुन्हा मनसेत येण्याचा निर्णय घेतला असल्याच त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र अद्याप पंजाबी यांनी प्रवेशाची तारीख जाहीर केलेली नाहीये.

महत्त्वाच्या बातम्या
“भारतात परिस्थिती ठीक नाही, भाजपकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न,” राहुल गांधींची घणाघाती टिका
‘रानबाजार’मधील बोल्ड सीन्सवर ट्रोल करणाऱ्यांना तेजस्विनीनं स्पष्टच सांगितलं; “कपडेच काढायचे असते तर….”
लाल महालातील लावणीचा वाद! अखिल भारतीय मराठा महासंघ आक्रमक; गौमूत्राने केले शुद्धीकरण
‘रानबाजार’मधल्या बोल्ड दृश्यांमुळे तेजस्विनी ट्रोल; तेजस्विनीच्या आईने टीका करणाऱ्यांनाच झापले