Share

‘दारूडा संत्रा आमदार’ म्हणणाऱ्या सेनेवर शहाजीबापु संतापले, थेट मातोश्रीवर केली टीका, म्हणाले..

काय झाडी, काय डोंगर, एकदम ओक्के या डायलॉगबाजीने फेमस झालेले आमदार शहाजीबापू पाटील आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र, यावेळी ते चर्चेत येण्याचं कारण म्हणजे त्यांचा कोणता डायलॉग नाही तर, त्यांच्यावर शिवसेनेकडून करण्यात आलेल्या टीका हे कारण आहे.

काल माळशिरस तालुक्यातील संगम येथे युवासेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी “संत्रा आमदार मुर्दाबाद, शहाजीबापू मुर्दाबाद” अशा घोषणा देत युवासेनेकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. युवासेनेने बॅनर लावून आमदार शहाजी बापू पाटील यांना गाढव म्हटले आहे.

मी दारुडा संत्रा आमदार अशा देखील घोषणा युवासेनेने दिल्या होत्या. यालाच प्रत्युत्तर देतं शहाजी बापू पाटील यांनी शिवसेना लक्ष केलं आहे. आपण असल्या टीकेला भीक घालत नसून या विरोधकांना थेट मैदानात उत्तरे देणार असा इशारा शहाजीबापू पाटील यांनी दिला आहे.

माध्यमांशी बोलताना शहाजी बापू पाटील यांनी म्हंटलं आहे की, ‘माझ्यावर टीका करायला आणि बदनाम करायला मातोश्री, सेना भवन आणि मुंबई येथून आदेश निघत असले, तरी मी या कोणालाच भीक घालत नाही,’ असं म्हणत त्यांनी शिवसेनेला जोरदार लक्ष केलं आहे.

दरम्यान, पुढे बोलताना शहाजी बापू पाटील यांनी म्हंटलं आहे की, ‘सत्ता गेल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे.’ कसले 50 खोके, साधी पेटीही पाहायला मिळत नाही. आता विरोधकांना थेट मैदानात उत्तरे देऊ, असं थेट आव्हान शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेला दिलं आहे.

यावेळी बोलताना शहाजी बापू यांनी राष्ट्रवादीला देखील लक्ष केलं आहे. ‘सत्ता आणली आणि शिंदे यांना मुख्यमंत्री केले. त्यामुळे आपल्याला जॉनी लिव्हर म्हटल्याचा अभिमान असल्याचा टोला शहाजी बापू यांनी अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना लगावला. याचबरोबर आपण पवारसाहेब किंवा अजितदादा यांचेवर काहीच बोललो नाही, ती बोलायची वेळ आणू नका, असा इशाराही शहाजीबापूंनी दिला.

वाचा युवासेनेने काय म्हंटलंय?

काल ‘बापू मतदारसंघाकडे लक्ष द्या, महाराष्ट्राचा मनोरंजन दौरा बंद करा असेही शिवसेनेने सुचवले आहे. स्वतःच्या बायकोला बरेच दिवस लुगडं न घेतल्याचे बोलणारे पाटील बंगले भाड्याने देण्याचे वक्तव्य करत असल्याने त्यांच्या बेताल वक्तव्यांचा काल युवासेनेने चांगलाच समाचार घेतला.

काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सांगोला येथे भाड्याने बंगले देतो, असे वक्तव्य शहाजीबापूंनी केलं होतं, त्याविरोधात युवासेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. काल माळशिरस तालुक्यातील संगम येथे युवासेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

बंडखोर आमदार जयंत पाटलांच्या संपर्कात, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने सांगितली ‘अंदर की बात’
उद्धव ठाकरेंच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार म्हणणारे माजी खासदार शिंदे गटात सामील
Asia Cup: काय आहे जय शहा आणि तिरंगा वादाचे संपूर्ण सत्य? भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान असं काय घडलं?
PHOTO: २९ व्या वर्षी चित्रपटात पदार्पण, १७ वर्षात १० चित्रपट, आता ४६ व्या वर्षी केले बोल्ड फोटोशूट
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now