Share

‘उद्धव ठाकरेंना सांगोल्यात बंगला भाड्याने घेऊन देतो, फक्त..’, शहाजीबापूंनी दिलं ओपेन चॅलेंज

shhaji bapu patil
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून शिंदे गट हा चांगलाच चर्चेत आहे. त्यानंतर राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झालं. तेव्हापासून कोणत्या ना कोणत्या कारणावरून शिंदे गटातील नेते मंडळी चर्चेत आहेत, विरोधकांकडून सतत सत्ताधारी नेत्यांची कोंडी  करण्याचा प्रयत्न आहे.
सध्या राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. शिंदे गटातील आमदार थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना लक्ष करताना पाहायला मिळत आहे. यामुळे सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.
अशातच शिंदे गटातील नेहमीच चर्चेत असलेल्या आमदार शहाजीबापू पाटील यांनी थेट उद्धव ठाकरेंना ओपेन चॅलेंज दिले आहे. यामुळे आता शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष आणखीनच वाढणार असल्याच पाहायला मिळत आहे. यानिमित्ताने शहाजीबापू पाटील हे पुन्हा चर्चेत आले आहे.
वाचा नेमकं त्यांनी काय म्हंटलंय?
माध्यमांशी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील यांनी थेट ठाकरे पिता – पुत्रावर निशाणा साधला आहे. मी उद्धवसाहेब आणि आदित्यसाहेब यांना सांगोल्यात दोन बंगले भाड्याने घेऊन देतो. माझ्यावर लक्ष ठेवा आणि काय पाडायचं ते पाडा. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त वेळा पडायचा विक्रम माझ्या नावावर असल्याच त्यांनी म्हंटलं आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दावा केला होता की, शिंदे गटातील 15-16 आमदार आमच्या संपर्कात आहेत. यावर आता शहाजीबापूंनी पलटवार केला आहे. खैरे यांना प्रत्युत्तर देताना पाटील म्हणाले, की खैरे खोटं सांगतात. 10 आमदार की 15 तेच अजून नक्की नाही, आधी ते करावं आणि मग सांगा म्हणावं.’
तर दुसरीकडे सध्याच राजकीय वातावरण हे दसरा मेळाव्यावरून तापलं आहे. याचाच धागा पकडत पाटील यांनी म्हंटलं आहे की, ‘दसरा मेळावा शिंदे साहेबांनी घ्यावा अशी आमची मागणी आहे. कारण आमची शिवसेना खरी आहे, ती बाळासाहेबांच्या विचारावर चालणारी आहे.’

महत्त्वाच्या बातम्या

PHOTO: साऊथच्या दिपीका पदुकोणने बेडरूममध्ये दिली किलर पोज, फोटो पाहून नेटकरी घायाळ
धक्कादायक; लिंगायत संतांचा दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार, आंदोलन पेटलं
T.V. Star: ‘या’ अभिनेत्रीला होते सेक्सचे व्यसन, ७०० पुरूषांसोबत बनवले संबंध, स्वत:च खुलासा करत म्हणाली..
Prime Minister: ‘तो’ शब्द ऋषी सुनक यांना पडलं महागात, पंतप्रधान शर्यतीत पडले मागे, आपल्याच पायावर मारली कुऱ्हाड

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now