Share

गुड बॉय झालास तर मी तुला घरातून हाकलून देईन, शाहरुखचा आर्यनबद्दलचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूड आणि त्याच्या चाहत्यांमध्ये बादशहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला काही काळापूर्वी ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून (NCB) क्लीन चिट मिळाली आहे. एनसीबीने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, ‘आर्यनविरुद्ध पुरावे सापडले नाहीत’. त्यानंतर आर्यन खानचे एक भावनिक विधानही सध्या चर्चेत आहे.(Shahrukh Khan, Aryan Khan, NCB, Chargesheet)

एनसीबीचे उपमहासंचालक संजय सिंह यांनी आर्यन त्यांना काय म्हणाला ते सांगितले होते. ‘तुम्ही माझ्यासोबत खूप चुकीचे केले आणि माझी प्रतिष्ठा खराब केली’, असे आर्यनने आपल्या वक्तव्यात म्हटले होते. दरम्यान, आर्यन आणि शाहरुख पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत आणि यामागचे कारण म्हणजे शाहरुखची १९९७ मधील मुलाखत आहे. ज्यामध्ये तो त्याचा मुलगा आर्यनबद्दल मोठे वक्तव्य करताना दिसत आहे.

यासोबतच तो स्वतः सिगारेट ओढतानाही दिसत आहे. ‘आर्यनने चांगला मुलगा होऊ नये अशी माझी इच्छा आहे’, असे शाहरुख म्हणतो, असे या मुलाखतीत स्पष्टपणे ऐकू येते. व्हिडिओमध्ये शाहरुखसोबत त्याची पत्नी आणि आर्यन खानची आई गौरी खानही दिसत आहे. शाहरुखने असे गमतीने म्हटले असले तरी आता ड्रग्ज प्रकरणात आर्यनचे नाव आल्यानंतर त्याचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

यासोबतच शाहरुखने ‘आपल्या मुलाला बिघडवण्यात कोणतीही कसर सोडणार नाही’, असे गमतीने म्हटले आहे. तो म्हणाला, ‘जर आर्यन चांगला मुलगा झाला तर ते त्याला घराबाहेर काढतील’. व्हिडिओमध्ये शाहरुख खान म्हणत आहे की, ‘आर्यन खानने मुलींसोबत हँग आउट करावे, ड्रग्स घ्यावे, सेक्स करावे’ असे वाटते. त्याने प्रत्येक वाईट गोष्ट केली पाहिजे.

त्याचबरोबर गौरी खानची इच्छा आहे की तिच्या मुलाने चांगला मुलगा व्हावा आणि सर्व चांगले काम करावे. त्याचवेळी, ड्रग्ज प्रकरणातून बाहेर आल्यानंतर आता आर्यन खानने लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करावे आणि आगामी सुपरस्टारच्या भूमिकेत दिसावे, अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे.

महत्वाच्या बातम्या-
कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या शाहरुखने नयनताराच्या लग्नाला लावली हजेरी; पाहा फोटो
शत्रुघ्न सिन्हा यांनी शाहरुखवर लावला गंभीर आरोप, म्हणाले, तो मला थॅंक्यु सुद्धा नाही म्हणाला
मी Gay….; शाहरुख खानचा सोबत काम करणाऱ्या अभिनेत्रींसोबतच्या नात्याबाबत मोठा खुलासा
शाहरुख खानचा मॉन्स्टर लुक आला समोर , बहुचर्चित जवान चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now