नुकतेच शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या पठाण चित्रपटातील एक गाणे रिलीज झाले. बेशरम रंग गाण्याचे नाव असलेल्या या गाण्यात दीपिका पदुकोण भगव्या रंगाच्या कपड्यात दिसत आहे. गाणे रिलीज झाल्यापासून त्यावर गदारोळ सुरू आहे.
विरोध करणारे म्हणत आहे की, दीपिकाने भगव्या रंगाचे कपडे घातले असून ‘बेशरम रंग’ हे गाण्याचे बोल आहे. या गोष्टीला लक्षात घेऊन या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी वाढत आहे. दीपिका पदुकोणच्या आधीही अनेक अभिनेत्री भगव्या पोशाखात चित्रपटांमध्ये रोमान्स करताना दिसल्या आहेत.
‘पठाण’ चित्रपटातील गाण्याच्या माध्यमातून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता. सध्याची टीका पाहता शाहरुख-दीपिकाचे चाहते सोशल मीडियावर त्यांच्या समर्थनार्थ पोस्ट करत आहेत. चाहते त्यांच्या आवडत्या कलाकारांना सपोर्ट करत आहेत. या चाहत्यांनी ट्विटरच्या माध्यमातून अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री कंगना राणौत यांच्यावर निशाणा साधला.
अभिनेत्री कंगना राणौतच्या चित्रपटातील एक सीन सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. कंगनाने ऑरेंज कलरचा ड्रेस घातला असून या सीनमध्ये ती दारू पिताना दिसत आहे. या दोन्ही कलाकारांच्या दृश्यांवर नेटिझन्सनी आक्षेप घेतला आहे.
‘मैने प्यार क्यूं किया’ या चित्रपटातील एका गाण्यात सुष्मिता सेनने भगव्या साडीत सलमान खानसोबत रोमान्स केला होता. लगा रे प्रेम रोग असे बोल असलेले हे गाणे लोकांना खूप आवडले होते. बेटा चित्रपटातील ‘धक धक करने लगा” या गाण्यात माधुरी दीक्षित भगव्या कपड्यात दिसली होती. हे गाणे जबरदस्त हिट झाले. या गाण्यानंतर माधुरीला धक धक गर्ल या नावानेही हाक मारली गेली.
मोहरा चित्रपटातील ‘टिप टिप बरसा पानी’ या गाण्यावर रवीना टंडनने अक्षय कुमारसोबत भगव्या ड्रेसमध्ये रोमान्स केला. हे गाणेही खूप हिट आणि लोकप्रिय झाले होते. रवीना टंडननंतर, कतरिना कैफनेही सूर्यवंशी चित्रपटात अक्षय कुमारला ‘टीप टिप बरसा पानी’वर भगवी साडी घालून रोमान्स केला.
काजोल दिलवाले चित्रपटात शाहरुख खानला भगव्या साडीत रोमान्स करताना दिसली होती. हे गाणेही खूप गाजले.
अभिनेत्री दिशा पटानी ‘भारत’ चित्रपटात सलमान खानसोबत भगव्या साडीमध्ये डान्स करताना दिसली होती.
महत्वाच्या बातम्या
‘लिहून देतो, एक दिवस तू…’, युवराजच्या वडिलांचा अर्जून तेंडुलकरला खास संदेश
छत्रपती शिवाजी महाराज हे मराठ्यांचे राजे नव्हते तर…; कालीचरण महाराजांचे वादग्रस्त वक्तव्य
manoj pawar : शिंदेंना धक्का! सत्तेवर लाथ मारत शिंदे गटात गेलेला ‘हा’ बडा नेता पुन्हा आला ठाकरे गटात