बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानला (Shahrukh Khan) आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्याला बॉलिवूडमध्ये ते स्थान मिळाले आहे, जे प्रत्येकाला जमत नाही. पण या प्रसिद्धीमागेही असे सत्य दडले आहे, जे जाणून तुम्हालाही धक्का बसेल. करोडो हृदयांवर राज्य करणारा शाहरुख खान अशी जीवनशैली जगतो, ज्याबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. (Shah Rukh Khan’s personal life)
शाहरुख खानला स्मोकिंगचे व्यसन आहे आणि त्याने हे उघडपणे जाहीर केले आहे. 2011 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत, अभिनेत्याने स्वत: त्याची अस्वस्थ सवय सांगितली आणि खुलासा केला की तो दिवसाला 100 सिगारेट ओढतो आणि सुमारे 30 कप ब्लॅक कॉफी पितो. याच मुलाखतीत शाहरुखने त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयीविषयीही सांगितले.
शाहरुख खानने सांगितले की, त्याच्या वडिलांचे दिल्लीत रेस्टॉरंट होते आणि पठाणी जेवण हे त्यांचे वैशिष्ट्य होते तर आई आश्चर्यकारक हैदराबादी जेवण बनवते. त्याने असेही सांगितले की जोपर्यंत त्याची आई जिवंत होती तोपर्यंत ती त्याला स्वतःच्या हाताने खाऊ घालायची. याच मुलाखतीत शाहरुख खाननेही आणखी एक मोठा खुलासा केला होता. त्याने मला सांगितले की मला झोप येत नाही. त्यामुळे सुमारे 100 सिगारेट ओढतो.
शाहरुख पुढे म्हणतो, मी जेवायला विसरतो. अनेकवेळा शूटिंगच्या काळात मला आठवत की मी जेवलो नाही, अं…मी पाणी देखील पिलेल नाही. मी एकंदर तीस कप ब्लॅक कॉफी पितो आणि त्यामुळेच माझ्याकडे सिक्स पॅक ऍब्स आहेत. मी स्वत:ची जितकी कमी काळजी घेतो तितकी डायट माझी आपोआप होऊन जाते.
अभिनेत्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, शाहरुख खान शेवटचा ‘झिरो’ चित्रपटात दिसला होता, या चित्रपटात अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफसोबत होत्या. हा चित्रपट आनंद एल राय यांनी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट पडद्यावर अजिबात आवडला नाही. या चित्रपटानंतर शाहरुखने दीर्घ ब्रेक घेतला. आता शाहरुख लवकरच सिद्धार्थ आनंदच्या ‘पठाण’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका आणि जॉन अब्राहम दिसणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
राजकुमार हिरानींच्या चित्रपटात या लूकमध्ये दिसणार शाहरुख खान; बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीमध्ये झाला खुलासा
स्टाईलिश लूक, जबरदस्त ऍब्स, शाहरुख खानने शेअर केला ‘पठाण’चा पहिला लूक; कॅप्शनने लोकांना लावले वेड
शाहरुख खान आणि दीपिका पठाणच्या शुटिंगसाठी पोहोचले या ठिकाणी, होणार जबरदस्त फाईट
शाहरुख खान आणि दीपिका पठाणच्या शुटिंगसाठी पोहोचले या ठिकाणी, होणार जबरदस्त फाईट