Share

‘मिस्ट्री फ्रेंड’सोबत दिसली शाहरुख खानची मुलगी सुहाना; पापाराझींना पाहताच केले असे काही की..

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या मुलीचे म्हणजेच सुहान खानचे सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोविंग्स आहेत. सुहानाने बॉलिवूड विश्वात पदार्पण केले नसले तरी ती अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे सोशल मिडीयावर चर्चेचा भाग बनत असते. आता देखील सुहाना एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

मंगळवारी सुहाना आपल्या मित्रासोबत कारमधून जात असताना तिला आपल्या कॅमेरात कैद करण्याचा प्रयत्न पापाराझींनी केला होता. परंतु यावेळी चक्क सुहाना खानने आणि तिच्या मिस्ट्री फ्रेंडने तोंड लपविले. यावेळी सुहानाने शेवाळी रंगाचा चेक्सचा शर्ट घातला होता. तर तिचा मिस्ट्री फ्रेंड स्लीव्ह स्वेटशर्टवर होता.

त्यामुळे आता सुहाना खानचा हा मिस्ट्री फ्रेंड कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मुख्य म्हणजे या दोघांनी तोंड लपवण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांच्याविषयी वेगवेगळ्या चर्चा सोशल मिडीयावर रंगल्या आहेत. सुहाना खानचे पापाराझींनी टीपलेले कारमधील फोटो सध्या सगळीकडे व्हायरल झाले आहेत.

या फोटोंना सेलिब्रिटी फोटोग्राफर वरिंदर चावल यांनी शेअर केले आहे. या फोटोंमुळे हा मित्र सुहानाचा बॉयफ्रेंड असल्याचे सांगितले जात आहे. परंतु अद्याप याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. सुहाना खान अनेकवेळा आपली बालमैत्रीणी अनन्या पांडे आणि शनाया कपूरसोबत हँग आउट करताना दिसत असते.

सुहाना आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन या हँग आउट पार्टीचे फोटो शेअर करत असते. सांगण्यात येत आहे की, लवकरच सुहाना जोया अख्तरच्या लोकप्रिय कॉमिक ‘आर्ची’च्या हिंदी व्हर्जनमधून बॉलिवूड विश्वात पदार्पण करणार आहे.

सुहाना खान 2019 मध्ये न्यूयॉर्क विद्यापीठात शिकण्यासाठी गेली होती. त्यानंतर तिने इंग्लंडच्या आर्डिंगली कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतरच ती पुन्हा भारतात परतली.

महत्वाच्या बातम्या
बुलेटप्रेमींसाठी गुड न्युज! भन्नाट फिचर्ससह येतेय नवीन बुलेट ३५०; फिचर्स वाचून खुष व्हाल
तारक मेहतामध्ये दयाबेन न येण्याचं खरं कारण आलं समोर, स्वत: जेठालालने केला मोठा खुलासा
बड्या हस्तींवर धाडी टाकणाऱ्या ईडीचीच आता चौकशी होणार; मुंबई पोलीसांनी उचलले ‘हे’ मोठे पाऊल
धोनीच्या CSK मध्ये अचानक झाली ‘या’ धडाकेबाज खेळाडूची एन्ट्री, बाकीच्या संघांमध्ये पसरली दहशत

ताज्या बातम्या बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now