Share

कोणत्याही पुराव्याशिवाय माझ्या मुलाची बदनामी केली अन्…, शाहरूखच्या डोळ्यात आले पाणी

२०२१ हे वर्ष बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसाठी वाईट स्वप्न ठरले. गेल्या वर्षी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचे नाव ड्रग्ज प्रकरणात जोडले गेले होते. अनेक आठवड्यांनंतर या प्रकरणाशी संबंधित अशी माहिती समोर आली ज्याने सर्वांना आश्चर्यचकित केले. मात्र, गेल्या महिन्यात जेव्हा एनसीबीने आरोपपत्र दाखल केले तेव्हा आर्यन खानला त्यात क्लीन चिट देण्यात आली होती. त्या कठीण काळातही कुटुंबीयांनी मौन बाळगले होते आणि आताही त्यांना याबाबत काहीही बोलायचे नाही.

त्याचवेळी आर्यन खानला क्लीन चिट मिळाल्यानंतर शाहरुख खानचे एक वक्तव्य समोर आले आहे. याप्रकरणी तपासासाठी सज्ज असलेल्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) एनसीबीचे उपसंचालक (ऑपरेशन) संजय सिंह यांनी खुलासा केला. वास्तविक, एनसीबी अधिकारी संजय सिंह यांनी एक मुलाखत दिली आहे ज्यामध्ये त्यांनी शाहरुख खान आणि आर्यन खानच्या अटकेनंतर झालेल्या भेटीचा उल्लेख केला आहे.

आर्यन कोठडीत असताना शाहरुख खानने त्याची भेट घेतली होती आणि तो आपल्या मुलाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याबद्दल चिंतेत होता, असे संजय सिंहने आपल्या मुलाखतीत सांगितले. त्याने आर्यनला भेटण्याची आणि त्याच्यासोबत रात्र घालवण्याची परवानगीही मागितली होती, पण त्याला परवानगी मिळाली नाही.

संजय सिंह म्हणाले शाहरुखचा आरोप आहे की, कोणत्याही पुराव्याशिवाय आपल्या मुलाची बदनामी केली जात आहे. या संभाषणात शाहरुख खान ओल्या डोळ्यांनी म्हणाला, आम्हाला एखाद्या मोठ्या गुन्हेगार किंवा राक्षससारखे दाखवण्यात करण्यात आले आहे जे समाजाला नष्ट करण्यासाठी आले आहेत.

बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ऑक्टोबर २०२१ च्या सुरुवातीला मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली होती. अनेक न्यायालयीन सुनावणी, प्रचंड नाट्य आणि २६ दिवसांच्या प्रदीर्घ कोठडीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने २८ ऑक्टोबरला त्यांना जामीन मंजूर केला. यादरम्यान अभिनेता शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबियांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला.

महत्वाच्या बातम्या-
मी Gay….; शाहरुख खानचा सोबत काम करणाऱ्या अभिनेत्रींसोबतच्या नात्याबाबत मोठा खुलासा
शाहरुख खानचा मॉन्स्टर लुक आला समोर , बहुचर्चित जवान चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित
मी जुही, काजोल, उर्मिला, शिल्पासोबत बेडवर शाहरुख खानने केला धक्कादायक खुलासा
मी गे नाही, त्यामुळे मी कोणत्याही मुलीसोबत झोपेन शाहरुख खानने केला होता मोठा खुलासा

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now