शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या पठान (Pathaan) या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी पठानचा टीझर रिलीज झाला होता, ज्यामध्ये शाहरुखसोबत दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) दिसत होते. आता तो पुन्हा एकदा पठानच्या शूटिंगला जाताना दिसला.(Shah Rukh Khan leaves for Spain for Pathan’s shoot)
शाहरुख खान मुंबई विमानतळावरून स्पेनला रवाना होताना दिसला. अशा परिस्थितीत सीआयएसएफ जवानासमोरचे त्याचे हावभाव चाहत्यांची मने जिंकत आहेत. शाहरुख खान रात्री उशिरा मुंबई विमानतळावर दिसला. येथे शाहरुख एका व्यक्तीला भेटताना दिसला आणि त्याने सीआयएसएफ जवानाला शुभेच्छाही दिल्या.
शाहरुखचा हा क्षण पापाराझींनी कॅमेऱ्यात कैद केला. या व्हिडिओमध्ये शाहरुख खान त्याच्या कारमधून उतरत विमानतळाच्या आत जाताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळते की, शाहरुखने विमानतळावर आत जाण्यापूर्वी ड्रायव्हरला मिठी मारली यानंतर तो गेटच्या आत जात असताना एका CISF जवानाने त्याला थांबण्यास सांगितले. यावर शाहरुख थांबतो आणि त्याला अभिवादन करतो. त्यानंतर सीआयएसएफ जवान शाहरुखला जाण्यास सांगतात.
शाहरुख खान ‘पठान’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी स्पेनला जाणार असल्याचे वृत्त आहे. यशराज फिल्म्स निर्मित हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. बुधवारी शाहरुख खानने सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर शेअर करून रिलीज डेटची घोषणा केली. शाहरुखने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मला माहित आहे की मला उशीर झाला आहे. पण तारीख लक्षात ठेवा. पठाणांची वेळ आता सुरू होतोय. 25 जानेवारी 2023 रोजी सिनेमाघरात भेटू. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
पठानच्या टीझरबद्दल बोलताना, जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोणने त्यात शाहरुख खानच्या व्यक्तिरेखेची ओळख करून दिली. पठान मोहिमेवर निघाले आहेत. टीझरमध्ये शाहरुख खान पांढरा टी-शर्ट घालून अंधारातून बाहेर येतो आणि त्याच्या देशावरील प्रेमाबद्दल बोलतो. आपल्या चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर शाहरुख खाननेही ट्विटरवर चाहत्यांशी संवाद साधला. या प्रश्नोत्तराच्या सत्रात शाहरुख खानने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची मजेशीर उत्तरे दिली.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, ओमिक्रॉनमुळे आऊटडोअर शूटिंगवर बंदी आली होती आणि त्यामुळे शूटिंगलाही उशीर झाला. यानंतर शाहरुख खान आर्यनच्या केसमध्ये बिझी झाला. स्पेनमधील या शूटिंगचे मुख्य ठिकाण म्हणजे माद्रिदमधील स्टेडियम, जे बुलफाईट्ससाठी खूप प्रसिद्ध आहे. चित्रपटातील काही अॅक्शन सीन्स तेथे शूट होणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
कोण म्हणतं मी म्हातारा झालो.. मी अजून थकलेलो नाही, तुमची साथ असेपर्यंत हा गाडा सुरूच राहील
शॉर्ट कपडे घातल्यामुळे तरुणींना सहा लोकांनी केली चप्पलने मारहाण, पुण्यातील धक्कादायक घटना
वयाच्या ४५ व्या वर्षीही अमिषा पटेलचा बोल्डनेस कायम, फक्त टी शर्टवर असताना शेअर केला व्हिडीओ
रशियाने १५ वर्षांत सर्वोत्तम सैन्य कसं उभारलं? ज्याला घाबरून अमेरिकासुद्धा थरथर कापतीय; जाणून घ्या..