Share

माझ्यासोबत सेक्स करा आणि मार्क्स मिळवा, प्राध्यापकाची खुली ऑफर ; पोलीसांनी ठोकल्या बेड्या

आफ्रिकेन देश मोरोक्को येथील एका प्रतिष्ठित विद्यापीठातील एका प्राध्यापकाला सेक्सच्या बदल्यात मुलींना चांगले ग्रेड दिल्याबद्दल दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बुधवारी न्यायालयाने आरोपी प्राध्यापकाला असभ्य वर्तन, लैंगिक शोषण आणि विद्यार्थिनींवरील हिंसाचारासाठी दोषी ठरवले आहे.

न्यायालायने दिलेल्या अहवालानुसार, हे प्रकरण मोरोक्कन शहरातील सेटात येथील हसन आय विद्यापीठाशी संबंधित आहे. या विद्यापीठातील विधी व अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थिनींना चांगले गुण देण्याच्या बदल्यात सेक्ससाठी ब्लॅकमेल करत होते. त्यांच्याशिवाय अन्य ४ प्राध्यापकांचाही यात सहभाग आहे.

मोरोक्कन स्थानिक वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, ‘सेक्स-फॉर-ग्रेड’ स्कँडलमधील आरोपी प्राध्यापक व इतर चार प्राध्यापकांना न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये आरोपी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमधील लीक झालेली संभाषणे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. यामध्ये प्राध्यापकांनी विद्यार्थिनींना चांगल्या गुणांच्या बदल्यात शारिरीक संबंध ठेवण्यास सांगितले होते.

‘सेक्स फॉर ग्रेड’ स्कँडल समोर आल्यानंतर हसन विद्यापीठाच्या कायदा आणि अर्थशास्त्र विद्याशाखेच्या विभागप्रमुखाने नोव्हेंबर २०२१ मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर या प्राध्यापकावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाविरोधात नागरिकांच्या संतापाच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या.

ही घटना समोर आल्यानंतर देशाच्या कानाकोपऱ्यातून पीडितांनी पुढे येऊन आपल्यावर झालेल्या अमानुषतेबद्दल समाजाला सांगितले. त्याच क्रमाने, औजदा या ईशान्येकडील शहरातील एका माजी विद्यार्थिनीनेही तिच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाबद्दल सांगितले की, नॅशनल स्कूल ऑफ बिझनेस अँड मॅनेजमेंटच्या एका प्राध्यापकाने लैंगिक संबंध न ठेवल्यास तिचे करिअर नष्ट करण्याची धमकी दिली होती.

या गदारोळानंतर सरकारने गेल्या महिन्यात या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. न्यायालयात या प्रकरणाबद्दल सुनावणी सुरु होती. अखेर बुधवारी न्यायालयाने त्या ५ प्राध्यापकांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. मोरोक्कोमध्ये न्यायालयाने पहिल्यांदाच असा निकाल दिला आहे. न्यायालयाच्या अहवालात म्हटले आहे की, मोरोक्कोमध्ये अशा घटनांची मोठी साखळी आहे. या घटनांमुळे मोरक्कन विद्यापीठांची प्रतिमा खराब झाली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
हे आहेत ‘या’ आठवड्यातील छप्परफाड परतावा देणारे शेअर्स, एकाने दिला ९०% तर एकाने ५०% परतावा
जेव्हा आलिया भट्टने तिच्या बेडरूममधील रहस्य केले उघड, सोशल मिडीयावर उडाली खळबळ
याला म्हणतात नशीब! मटन घ्यायला गेला आणि करोडपती बनला

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now