आयर्लंडमध्ये भाड्याच्या घरासाठी एक विचित्र जाहिरात दिली जात आहे. या जाहिरातींमध्ये घरमालक भाडेकरूंकडून ‘सेक्स फॉर रेंट’ची मागणी करत आहेत. ‘सेक्स फॉर रेंट’ची सुविधा फक्त मुलींसाठी आहे, असेही या जाहिरातींमध्ये लिहिले जात आहे. आयर्लंडमध्ये घरांच्या कमतरतेमुळे, भाड्यात लक्षणीय वाढ झाली आहे. भाडेकरू वाढलेल्या किमतीची पूर्तता करू शकत नाहीत आणि त्यांना ‘रेंटच्या बदल्यात सेक्स’च्या कमी किमतीतील किंवा मोफत खोल्यांमध्ये राहणे भाग पडत आहे.
डब्लिनमध्ये भाड्याच्या घरासाठी जाहिरात लिहिली होती, ‘उत्तर डब्लिनमध्ये एक खोली आहे. एकट्या मुलीसाठी रिकामे घर आहे, ज्याचे भाडे भरावे लागणार नाही, फक्त ‘थोडी मजा’ करावी लागेल. फक्त मुलींनीचं संपर्क करा.’ अशीच दुसरी जाहिरात होती, ‘शहरापासून अगदी जवळ असलेल्या सेंट्री डब्लिनमध्ये एक खोली आहे. घराजवळ कार पार्किंग आणि बस स्टॉपची सोय. त्वरित करा परंतु केवळ सुंदर आणि मोहक मुलींनी संपर्क साधावा.
डब्लिन रेप क्रायसिस सेंटरचे मुख्य कार्यकारी नोलिन ब्लॅकवेल यांनी अशा व्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अशा व्यवस्थेत भाडेकरूचे हक्क हिरावून घेतले जातात आणि त्यांना समान अधिकार मिळत नाहीत, असे त्या सांगतात. नोएलिन म्हणतात की रेंटच्या बदली सेक्स हे वास्तव बनले आहे.
अशा भाड्याच्या घरात भाडेकरू आल्यावर ही व्यवस्था तार्किकदृष्ट्या योग्य मानली जाऊ लागते. पण सत्य हे आहे की असे सेक्स हे संमतीविना सेक्स करण्याबरोबरच आहे. नोएलिन सांगतात, ‘अशा प्रकरणांमध्ये घरमालक नियम बनवतो आणि त्याच्या इच्छेनुसार लैंगिक सेवा घेतो. ‘सेक्स फॉर रेंट’ व्यवस्थेत भाडेकरूकडे कोणतेही अधिकार नाही. घर न मिळाल्याने किंवा पैशांची कमतरता असल्याने लोक अशा घरात येतात.
सेक्स फॉर रेंटमध्ये भाडेकरूकडे या गोष्टीची कोणतीही सुरक्षा नसते कि त्याला भाड्याच्या घरात किती दिवस राहता येईल. त्यांच्याकडे भाडे करारही नसतो. त्यांना फक्त घरमालकाची इच्छा पूर्ण करायची असते. या व्यवस्थेत भाडेकरूच्या इच्छेची कोणतीही काळजी घेतली जात नाही. नोएलिन म्हणते की जेव्हा घरमालकाला हवे असते तेव्हा भाडेकरूला त्याच्यासमोर हजर व्हावे लागते, त्यामुळे शोषण होण्याची शक्यता असते.
रेसिडेन्शिअल टेनन्सी बोर्डाने शुक्रवारी एक अहवाल प्रकाशित केला, त्यानुसार २०१७ नंतर या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत भाड्यात सर्वाधिक वाढ झाली आहे. आयर्लंडमध्ये सरासरी मासिक भाडे १ लाख १९ हजार आहे. त्याच वेळी, डब्लिनमध्ये सध्या सरासरी भाडे १ लाख ६३ हजार प्रति महिना आहे, तर लिमेरिकमधील दर ५४ हजारांपेक्षा थोडे जास्त आहेत.
गेल्या महिन्यात प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात १ नोव्हेंबर रोजी देशभरात फक्त १,४६० घरे भाड्याने उपलब्ध होती. एका वर्षात भाड्याच्या घरांमध्ये ६५ टक्के घट झाल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.
आयर्लंड सरकारने सेक्स फॉर रेंटच्या जाहिरातींचा निषेध केला आहे आणि लोकांना अशा गोष्टींची तक्रार करण्यास सांगितले आहे. गृहनिर्माण मंत्री डॅरेग ओब्रायन म्हणाले, “लैंगिक संबंधाच्या बदल्यात मालमत्ता भाड्याने दिल्या जाणाऱ्या कोणत्याही घटनेचा मी तीव्र निषेध करतो. जिथे अशा जाहिराती दिसतील तिथे पोलिसांना कळवायला आम्ही लोकांना प्रोत्साहन देऊ.”