Share

Gang Rape Case: दिल्लीतील निर्भयापेक्षाही भयानक घटना महाराष्ट्रात; पिडीत महीलेची भयंकर स्थितीत मृत्यूशी झुंज

nirbhaya repeat

सामूहिक बलात्कार(Gang Rape Case): धक्कादायक आणि हृदयाला छिन्न करणारी ही घटना आहे. घरगुती वादातून एकटीच माहेरी जात असलेल्या महिलेवर तिघांकडून अत्याचार करण्यात आला. त्यानंतर या पिडित महिलेवर धारदार शस्त्राने वारदेखील करण्यात आले. नंतर ती गावकऱ्यांना बेशुद्धावस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना कारधा पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.

त्यानंतर पोलिसांनी महिलेला शासकीय रुग्णालयात दाखल केले. माणुसकीला कलंक लावणारी भयानक घटना घडल्याने राज्याला मोठा झटका बसला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी आहे. ती ३० जुलैला घरगुती वादातून एकटीच माहेरी जाण्यासाठी निघाली. माहेरी जात असताना वाटेत तिला श्रीराम उरकुडे नामक ४५ वर्षीय इसम भेटला. त्या व्यक्तीने तिला कारने घरी सोडतो असे सांगून गाडीत बसवले. परंतु, तिला घरी न नेता मुंडीपार या गावाजवळ नेले व रात्री तिच्यावर अत्याचार केला.

मुंडीपार हे गाव गोंदिया जिल्हातीलच आहे. ३१ तारखेला दुसऱ्या दिवशी पळसगाव रस्त्यालगत पुन्हा त्याने तिच्यावर अत्याचार केला व जंगलात सोडून दिले. १ तारखेला सोमवारी घरी सोडण्याच्या बहाण्याने दोघांनी शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पीडिता बेशुद्धावस्थेत पडून असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिला जिल्हा रुग्णालयात व नंतर शासकीय रुग्णालय नागपूर येथे दाखल केले. या आरोपींनी महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केला होता.

नागपूर रायपूर महामार्गावर कन्हाडमोह या खेडेगावात रस्त्याशेजारी गंभीर जखमी अवस्थेत पीडिता दिसून आली. या महिलेवर तीन नराधमांनी बलात्कार केला आहे. एवढंच नाही तर बलात्कारानंतर या महिलेवर धारदार शस्त्राने वारही करण्यात आलेत. याप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली असून एक आरोपी फरार आहे. दिल्लीतील निर्भयाकांडापेक्षाही हादरून टाकणारा बलात्काराचा प्रकार भंडाऱ्यात घडल्याने मोठा धक्का बसला आहे. 30 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान 35 वर्षीय महिलेवर कनहाडमोह गावाजवळ वेगवेगळ्या आरोपींनी सामूहिक बलात्कार केला होता.

रुग्णालयात असताना रक्तस्राव थांबत नव्हता म्हणून डॉक्टरांनी तिच्यावर कोलोस्टॉमी शस्त्रक्रिया केली. ही घटना निर्भया प्रकरणासारखी भयानक असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. आवश्यक नमुने फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. पोलिस निरीक्षक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या
Dipak Kesarkar: दिपक केसरकरांना शिंदे गटाच्या प्रवक्तेपदावरून हटवले; ‘हा’ नेता असेल नवा प्रवक्ता
Rape Case: हनुमान गडाचे मठापधिपती खाडे महाराजांवर बलात्काराचा गुन्हा दाखल; पीडिता म्हणाली, त्यांनी मला… 
Ajit Pawar: राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस! अजितदादांना विरोधी पक्षनेतेपद दिल्याने ‘हा’ बडा नेता नाराज
BJP: दिपक केसरकरांना भाजपने झापले, शिंदे गटाला दिला इशारा; त्यांच्या तोंडाला आवर घाला नाहीतर…..

क्राईम आरोग्य इतर ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now