Sonali Phogat, Rape, Rinku Dhaka, Murder/ भाजप नेत्या आणि माजी अभिनेत्री सोनाली फोगट हिचे वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झाले. प्राथमिक माहितीनुसार मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी सोनालीची हत्या झाल्याचा आरोप तिच्या भावाने केला आहे. तिच्यावर बलात्कार होत होता, अशी तक्रार सोनालीचा भाऊ रिंकू ढाका याने गोवा पोलिसांत दाखल केली आहे.
आपल्या बहिणीची हत्या केल्याचा आरोप त्याने केला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, फोगट हिच्या मृत्यूचा पोलीस सखोल तपास करत आहेत. पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत रिंकूने सोनालीचा पीए सुधीर सांगवान आणि त्याचा सहकारी सुखविंदर यांच्यावर बलात्कार आणि हत्येचा आरोप केला आहे.
सोनालीने सुधीर सांगवान आणि सुखविंदरवर विश्वास ठेवायला सुरुवात केली होती, असे त्याने म्हटले आहे. सुधीर सांगवान यांनी जेवणात विष मिसळले, त्यामुळे सोनालीचा मृत्यू झाला. तीन वर्षांपूर्वी सुधीरने सोनालीच्या जेवणात मादक पदार्थ मिसळून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप रिंकूने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे.
यानंतर त्याने सोनालीवर अनेकवेळा बलात्कार केला. त्याने बलात्काराचा व्हिडिओ बनवला होता. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन सुधीर सोनालीला ब्लॅकमेल करत होता. सुधीरने सोनालीचे घर लुटल्याचे रिंकूने म्हटले आहे. त्यानंतर त्याने घरचा स्वयंपाकी आणि इतर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आणि स्वत:च्या माणसांना कामावर घेतले.
सोनालीच्या जेवणाची व्यवस्था सुधीर करत असे. त्याने सोनालीला अन्नात स्लो पॉयझन मिसळून देण्यास सुरुवात केली. सुधीरने तिला खीर खायला दिल्याचे सोनालीने तिचा भाऊ रिंकूला सांगितले. खीर खाल्ल्यानंतर तिचे हात पाय थरथरू लागले. तिची भीती आणि अस्वस्थता वाढली होती. सोनाली हिसारमध्ये येऊन पोलिसांना तिच्यासोबत होत असलेल्या अत्याचाराबद्दल सांगणार होती आणि सुधीर सांगवानला कठोर शिक्षा देणार होती.
खरंतर सोनाली ही भाजपची नेता होती तशीच एक अभिनेत्री होती. तिने अनेकदा तिच्या छोट्या व्हिडीओज आणि मनमोहक फोटोंद्वारे सोशल मीडियावर वर्चस्व गाजवले. अशा परिस्थितीत, तिच्यासाठी फिटनेस मेंटेन ठेवणे अत्यावश्यक होते. सोनाली तिच्या तब्येतीची नेहमीच काळजी घेत असे. हृदयविकाराच्या झटक्याने सोनालीचा अचानक मृत्यू होणे शक्य नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
महत्वाच्या बातम्या-
Rape Case: हनुमान गडाचे मठापधिपती खाडे महाराजांवर बलात्काराचा गुन्हा दाखल; पीडिता म्हणाली, त्यांनी मला…
Rape: त्याने मला घरी बोलावून बेडरूममध्ये नेले अन्.., स्टायलिस्टचा प्रसिद्ध गायकावर बलात्काराचा आरोप
Accused of rape on player: संघाला विश्वचषक जिंकवून दिलेल्या खेळाडूवर बलात्काराचा गुन्हा दाखल; १० हजार महीलांवर बलात्कार केल्याचा आरोप
Sonali Phogat: मृत्युच्या काही तासांपुर्वीच सोनाली फोगाटने शेअर केला होता हा व्हिडीओ, तिला यातून काय दाखवायचे होते?