अंधश्रद्धा(Superstition): समाजात अजूनही अंधश्रद्धेचा बराच अंश बाकी आहे. सर्वात जास्त बघायला मिळणारी अंधश्रद्धा म्हणजे एखादी स्त्री जर बाळाला जन्म देऊ शकत नसेल तर तिला डॉक्टरकडे न नेता बुवा महाराजांकडे घेऊन जाणं. त्यांच्या मनाप्रमाणे वागून नको त्या गोष्टीला तिला बळी पडावं लागत. अशीच एक माणुसकीला काळिमा फासणारी घटना पुण्यात घडली आहे. एका मांत्रिकाने कुटुंबीयांसमोर महिलेला नग्नावस्थेत अंघोळ करायला लावली. पुत्र प्राप्तीसाठी व कुटुंबाच्या सुखासाठी ही पूजा करण्यात आली होती.
त्या पुजेमध्ये घरातील भानामती नष्ट होण्यासाठी हा किळसवाणा व घृणास्पद प्रकार महिलेला करण्यास सांगितला. हा प्रकार घरातील सर्व कुटुंबीयांसमोर करायला सांगितला त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. शिवराज गोरडकर असे या महिलेच्या पतीचे नाव आहे. या प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करून पती शिवराज गोरडकर, सासरे राजेंद्र गोरडकर, सासू चित्ररेखा गोरडकर यांच्यासह मांत्रिक मौलाना बाबा जमादार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पीडित महिलेचा विवाह 2013 मध्ये आरोपी असलेला पती शिवराज गोरडकर याच्याशी झाला होता. लग्न झाल्यापासून कुटुंबीयांनी पीडित महिलेला त्रास द्यायला सुरवात केली. अनेक वर्ष महिलेने हा त्रास सहन केला परंतु कोणाला सांगितले नाही. मात्र काही दिवसांनी महिलेवर कुप्रथा करण्यास सुरुवात केली. महिलेला लग्नानंतर इतके दिवस मुलबाळ होत नसल्याने हा अंधश्रद्धेचा मार्ग तिच्या पतीने अवलंबला होता. यात वेगवेगळ्या पूजा करण्यात येत होत्या.
सासरच्या मंडळींकडून नेहमी पीडित महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात येत होता. महिलेला तिच्या आई-वडिलांकडून लग्नात भेट मिळलेले दागिने आणि फ्लॅटची कागदपत्रे धोक्याने बँकेत ठेवले व त्यावर खोटी स्वाक्षरी करून ७५ लाखांचे कर्ज काढले. मांत्रिक मौलाना बाबा जमादार याने महिलेकडून प्रत्येकवेळी १ ते २ कोटी रुपये मागितले असून महिलेला मारहाणसुद्धा करण्यात आली.
पीडित विवाहित महिलेने याप्रकरणी तक्रार केली आहे. याप्रकरणाबाबत आता भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पती, सासू, सासरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीने केलेल्या पूजेत तिला सर्वांसमोर नग्न होऊन अंघोळ करायला लावली. याबाबत चार जणांवर गुन्हा दाखल झाला असून मांत्रिकाला अजून अटक करण्यात आली नाही. याबद्दलचा अधिक तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहेत.
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी देशात अनेक उपक्रम राबवले जातात. त्या उपक्रमातून समाज जागृतीचे कार्य केले जाते. तरीही समाजातून अंधश्रद्धा अजूनही पूर्णपणे नष्ट झालेली नाही. अजूनही बहुतांश लोक अंधश्रद्धेला बळी पडतात. बुवा महाराजांच्या जाळ्यात अडकतात. त्यांच्यावर पैसे खर्च करतात. तरीही त्यांचे डोळे उघडत नाहीत. पुण्याला घडलेली ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे.
महत्वाच्या बातम्या
Raju Shrivastav: अनोळखी व्यक्ती ICU मध्ये घुसल्यानंतर राजू श्रीवास्तवांच्या कुटुंबीयांनी घेतला मोठा निर्णय
Wedding Card: डॉक्टर जोडप्याने चक्क औषधाच्या पाकीटाप्रमाणे छापली लग्नपत्रिका, फोटो पाहून नेटकरी हैराण
Russia : भारतावर होणाऱ्या मोठ्या हल्ल्याचा झाला पर्दाफाश; समोर आलेली माहिती वाचून हादराल
आम्ही गद्दार नाही, आमच्या बापानं शिवसेना उभी केलीये; भावना गवळींनी थेट उद्धव ठाकरेंनाच दिले चॅलेंज