Share

politics : शिल्लक सेनेला शिवतीर्थावरील टोमणे मेळाव्यास परवानगी द्यावी, महाराष्ट्राचे मनोरंजन झाले पाहीजे

raj and udhhav thakare 2

politics: दसरा मेळावा घेण्यावरून शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात सध्या रस्सीखेच सुरू आहे. दसरा मेळावा शिंदे गटाकडून घेण्यात येणार असल्याच्या हालचाली वेगाने होत असल्याचे दिसते. त्याच सोबत उद्धव ठाकरेंनी सुद्धा शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने आता या वादात उडी घेतल्याचे दिसते.

प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्विट करत असे म्हंटले की, ‘शिवतीर्थावर टोमणे मेळावा घेण्यास परवानगी देवून टाकावी. खंजीर, मर्द, मावळा, वाघनखं, गद्दार, निष्ठा यातून होणाऱ्या मनोरंजनापासून महाराष्ट्राला वंचित ठेवू नये,’ अशी खोचक टीका गजानन काळे यांनी केली आहे.

ही टीका करून गजानन काळेंनी थेट शिवसेनेला डिवचले आहे. पुढे ते म्हणाले की, ‘यावेळची स्क्रिप्ट नेहमीप्रमाणेच बारामतीवरून येणार आहे. तमाम महाराष्ट्राला हा प्रश्न पडला आहे. हिंदुत्वाला तिलांजली दिल्यानंतर शिल्लक सेनेच्या दसरा मेळाव्याला अबू आजमी आणि ओवेसी स्टेजवर असणार आहेत का?’

असा जळजळीत सवाल गजानन काळे यांनी विचारला. तसेच शिवसेनेच्या नेत्यांनी याचे उत्तर द्यावे, अशी विनंतीही केली. दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दसरा मेळावा घेण्याची विनंती केल्याचे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच गाजले होते.

आता मुंबई मनपा आणि राज्य सरकारने शिल्लक सेनेला शिवतीर्थावर टोमणा मेळावा घेण्याची परवानगी द्यावी, असे म्हणत मनसे नेते गजानन काळेंनी थेट उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर सडकून टीका केली. याला शिवसेनेकडून प्रतिउत्तर काय मिळते? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. मात्र सध्या मनसेने या वादात उडी घेतल्याचे दिसते.

शिवसेनेत मोठे बंड घडून आल्यानंतर संकटकाळी ठाकरे कुटुंबाचा एक भाग म्हणून राज ठाकरे उद्धव ठाकरेंची पाठराखण करतील, असा सूर लोकांमध्ये कुठेतरी उमटत होता. मात्र राज ठाकरेंनी पहिल्यांदा लोकांशी जाहीर संवाद साधताना जी वक्तव्ये केली. त्यातून अशी शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले. उलट आता एकनाथ शिंदे व मनसे पक्ष यांची जवळीक वाढत असल्याचे चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-
Sharad Pawar : पत्राचाळ घोटाळ्यातील मास्टर शरद पवारच; गंभीर आरोप करत चौकशीची मागणी
Kohinoor diamond: कोहिनूर हिरा भगवान जगन्नाथांचा! हिरा इंग्लंडकडून परत आणा, राष्ट्रपतींच्या हस्तक्षेपाची मागणी
coins : १० रुपयांची नाणी स्वीकारण्यास नकार देणाऱ्या बॅंकेला युवकाने शिकवला चांगलाच धडा; वाचा नेमकं काय घडलं..

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now