राज्यात भाजपला डावलून शिवसेना, राष्ट्रवादी – कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या पक्षांनी मिळून महाविकास आघाडी स्थापन केले आहे. सरकारमधील नेत्यांकडून सरकार व्यवस्थित काम करत असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र अनेकदा ठाकरे सरकारमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.
तर दुसरीकडे आता शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रकरणात महिला शिवसैनिकाने शहर प्रमुखास चांगलेच चोपले आहे.
जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय? शिवसेना शाखेतच शहरप्रमुखाला महिला शिवसैनिकांकडून मारहाण करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.
आता मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. भाईंदर शिवसेना शहरप्रमुख पप्पू भिसे हे आहेत. आज दुपारी शिवसेनेचा एक पक्षांतर्गत कार्यक्रम होता. त्यावेळी महिला शहर संघटक वैदेही परूळेकर यांच्याशी त्यांचा वाद झाला. त्यानंतर शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
परुळेकर आणि अन्य महिलांनी पप्पू भिसे यांना शाखेच्या बाहेर खेचत बेदम मारहाण केली. तसेच घाणेरड्या शिव्या दिल्यावरून महिला शिवसैनिकाने शहर प्रमुखास मारले व काळे फासले. या मारहाणीत शहर प्रमुखाचे कपडे देखील फाटले. या प्रकरणी एकमेकांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, वेदाली यांच्या फिर्यादीवरून भाईंदर पोलिसांनी भिसे यांच्यावर विनयभंगासह मारहाण व जखमी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच भिसे यांनी देखील वेदाली सह अन्य ६ ते ७ महिलांवर एकत्र मिळून मारल्याची फिर्याद दिल्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
लैंगिक अत्याचार प्रकरणी गणेश नाईकांना तातडीने अटक होणार; चाकणकरांनी स्पष्टच सांगीतलं…
बाद झाल्यानंतर संतापला ईशान किशन, केलं असं काही की होऊ शकते कारवाई, पहा व्हिडीओ
शरद पवार, अजितदादांवर टीका म्हणजे राज्याच्या संस्कृतीला टार्गेट करण्यासारखं – रोहित पवार
रणबीर कपूरने आपल्या लग्नात एक्स गर्लफ्रेंड कतरिनाला केले कॉपी, हा आहे पुरावा, पहा फोटो