Share

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; किराणा दुकानात दारू विकण्यास परवानगी

udhav thackeray

आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या सुपर मार्केटमध्ये आता वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हा प्रस्ताव आधी विचाराधीन होता. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला. १००० चौरस फुटाच्या दुकानातच वाईन विक्री करता येणार आहे. (selling wine in super markets maharashtra government decision)

दहा वर्षांपूर्वीचा हा प्रस्ताव आहे. त्यामुळे आज निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. शेतकऱ्यांच्या फल उत्पादनावर वायनरी चालत असल्याने आज हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सांगितलं.

बैठक संपल्यानंतर मलिक यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. “महाराष्ट्रात बऱ्याच वायनरी आहेत. त्यामुळे आता सरकारने नवीन धोरण ठरवलं आहे. सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीची परवागनी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक हजार स्वेअर फुटापर्यंतच्या सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला ठेवण्याची परवानगी देण्यात येणार आहे”, असं नवाब मलिक म्हणाले.

दरम्यान, राज्याच्या वाईन धोरणावर टीका करणाऱ्या भाजपाचाही नवाब मलिक यांनी यावेळी समाचार घेतला. “गोव्यात आणि हिमाचलमध्येही भाजपाने हेच धोरण आणले आहे. त्यांची सत्ता असलेल्या अनेक राज्यात भाजपाने वाईन विक्रीचं धोरण स्वीकारलं आहे. इथे मात्र ते विरोध करत आहेत”, असा टोला मलिक यांनी लगावला.

ठाकरे सरकारनं राज्यातील किराणा आणि रेशन दुकानांना वाईन विक्रीसाठी (Wine Sale) परवानी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर आता भाजप नेते अधिक आक्रमक झाले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही तर महाराष्ट्राचे ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराच ठाकरे सरकारला दिलाय.

‘शेतकरी-कष्टकरी, गरीब, बारा-बलुतेदार अशा एकाही घटकाला राज्य सरकारनं गेल्या दोन वर्षाच्या कोरोना कालखंडात मदत केली नाही. सरकारचे प्राधान्य केवळ आणि केवळ दारुलाच! महाविकास आघाडीचे हे सरकार नेमके आहे तरी कुणाचे? सत्तेच्या ‘नशे’त धुंद सरकारनं गरिबांना थोडी तरी मदत करावी.

पेट्रोल-डिझेलऐवजी दारु स्वस्त! दारुबंदी संपवून दारुविक्रीला परवानगी! महाराष्ट्रात नवीन दारुविक्री परवाने देण्याचा निर्णय! आणि आता थेट सुपर मार्केट, किराणा दुकानातून घरोघरी दारू! महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही’, अशा शब्दात फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या निर्णयाचे वाभाडे काढले.

महत्त्वाच्या बातम्या
२०० फूट खोल दरीत कोसळूनही प्रवासी सुरक्षित, टाटाच्या कारची जबरदस्त कमाल
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा किरीट सोमय्यांच्या रडारवर; म्हणाले, ‘लवकरच..’
‘देव माझ्या ब्रा ची साईज घेत आहे’, अभिनेत्रीच्या वक्तव्याने देशात खळबळ, पहा व्हिडीओ
घरी कोणीही नसताना १० वर्षांच्या मुलाने घरातच घेतली फाशी, टीव्हीवर रोज पाहायचा क्राईम पेट्रोल

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now