Share

स्वार्थी होते भारतीय खेळाडू, चिप्ससाठी पुर्ण सिरीज टाकली होती धोक्यात, टिम पेनचा मोठा खुलासा

२०२१ मध्ये झालेल्या भारत विरूध्द ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या सामन्यावर एक डॉक्युमेंट्री रिलीज झाली आहे. हा सामना कर्णधार विराट कोहलीनंतर अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वाखाली खेळला गेला होता. या डॉक्युमेंट्रीनिमित्त सामना ज्या खेळाडूंमुळे जिंकला त्यांची यानिमित्त मुलाखत घेण्यात आली.

‘ बंदो मे दम था ‘ असे रिलीज झालेल्या डॉक्युमेंट्रीचं नाव आहे. या डॉक्युमेंट्रीनिमित्त पुन्हा एकदा जुन्या आठवणी ताज्या झाल्या होत्या.या डॉक्युमेंट्रीविषयी बोलताना रहाणे म्हणाला की, ” भारतीय संघ या सामन्यात अवघ्या ३६ रनवर ऑलआऊट झाला होता. त्यावेळी लोक आमच्याबद्दल वाईट बोलत होते. अगदी आमच्या विरोधातही गेले. सामना जिंकल्यानंतर या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या” , हे सांगत असताना तो गहिवरला होता.

भारतीय संघ २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यावेळी ४ सामने खेळले गेले होते. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाची तारांबळ करत केवळ ३६ धावांमध्ये सामना गुंडाळला होता. लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार कोहलीने कमबॅक करण्याची जबाबदारी रहाणेकडे दिली होती.

बॉर्डर गावसकर ट्रॉफी भारताच्या दृष्टीने ऐतिहासिक कसोटी मालिका होती. या मालिकेत रोहित शर्मा, मयंक अगरवाल, के. एल. राहुल, उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांसारखे दिग्गज खेळाडू जखमी झाले होते. तरीही या दुखापतग्रस्त खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच मायभूमीत दारुण पराभव केला होता.

कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी केली होती. याच सामन्यावर ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘ बंदो मे था दम’ ही डॉक्युमेंट्री रिलीज केली आहे.या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कर्णधार असलेल्या टीम पेनने खळबळजनक खुलासा केला आहे.

टीम पेन म्हणाला की, ” रोहित शर्मा, शुभमन गिल, ऋषभ पंत, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी या खेळाडूंमध्ये हा सामना घोक्यात आणला होता. तिसऱ्या सामन्यानंतर हे सगळे चित्र घडले होते. या खेळाडूंनी चिप्स आणि काही पदार्थांसाठी असे कृत्य केले होते. त्यावेळी मला ते खुप स्वार्थी असल्याचे पेनने सांगितले आहे.

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now