Share

Madhypradesh: सेल्फीचा मोह जीवावर बेतला! तब्बल १० जण गेले धबधब्यात वाहून; मुख्यमंत्र्यांनाही बसला धक्का

ramdaha

मध्य प्रदेश(Madhypradesh): दरवर्षी पावसाळ्यामध्ये धबधबा, डॅम, नदी, तलाव याचे सौंदर्य खुलून दिसते. ते सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते. सुटीच्या दिवशी विसावा घेण्याकरिता अनेक पर्यटक तेथे जातात. सेल्फीचा मोह आता कोणालाच आवरत नाही व दरवर्षी सेल्फी च्या नादात आपला जीव गमवावा लागतो. अशीच घटना छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यात घडली आहे.

रविवारी मध्यप्रदेशातील सिंगरौली येथील एक कुटुंब कोरिया जिल्ह्यातील रामदहा फॉल्स येथे पिकनिकसाठी गेले होते. यावेळी या कुटुंबातील लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी अंघोळ करताना धबधब्याच्या खोल पाण्यात ७ जणांचा बुडून मृत्यू झाला, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबातील दोन महिला सेल्फी काढण्यासाठी खाली उतरल्या.

त्या बुडू लागल्यानं कुटुंबातील इतर सदस्यांनी त्यांना वाचवण्यासाठी उड्या टाकल्या. पुढच्या काही क्षणांत सगळेच बुडाले. रविवारी ही घटना घडली. रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत यातील दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. चार जण बेपत्ता होते, त्यांना सोमवारी सकाळी बचाव पथकाने बाहेर काढले. स्वयंपाक करून खाऊन झाल्यावर सर्वजण धबधब्यात उतरले होते.

त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी एक तरुणी आणि तरुणाला बाहेर काढले. रत्नेश सिंग या युवकाचा मृत्यू झाला होता. सुरेखा सिंग या मुलीला गंभीर अवस्थेत बाहेर काढण्यात आले. तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच कोटाडोल पोलीस ठाणे आणि बचाव पथकही घटनास्थळी पोहोचले.

10 तासांहून अधिक काळ शोध मोहिमेनंतर त्यांना बाहेर काढण्यात यश आले. वारंवार अपघात होऊनही या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी रामदहा धबधब्याच्या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्र्यांनी कोरियाच्या जिल्हाधिकाऱ्यांना बचाव कार्यावर सतत लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या.

रामदहा धबधब्याच्या बाहेर फलकावर स्पष्ट इशारा लिहिला आहे की येथे आंघोळ करण्यास सक्त मनाई आहे. चेतावणी देणारा फलक या लोकांनी पाळला नाही. हा अपघात बैकुंठपूर मुख्यालयापासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेल्या रामदहा धबधब्यात झाला,आले होते.

महत्वाच्या बातम्या
Uddhav Thackeray : “उद्धव ठाकरे अजून किती दिवस बाळासाहेबांचा मुलगा म्हणून लोकांना ब्लॅकमेल करणार आहात?”
BIS Care app: आनंदाची बातमी! सणासुदीच्या दिवसात सोने चांदीच्या दरात तुफान घसरण; जाणून घ्या नवे दर
Durga Temple: इस्लामिक कट्टरपंथ्यांचा मंदिरात राडा, दुर्गापूजेसाठी तयार केलेल्या मुर्त्या फोडल्या अन्.., वाचून येईल संताप
Melghat: मी मुक्काम केलेलं घर रात्रभर गळत होतं, माझ्याकडून त्यांना दोन घरं, आजच भूमीपूजन – अब्दुल सत्तारांची घोषणा

ताज्या बातम्या आरोग्य इतर

Join WhatsApp

Join Now