Share

सलमानचा भाऊ सोहेलकडून घटस्फोट घेणाऱ्या सीमा खानचे रोहित शर्माशी आहे जवळचे नाते; वाचून चकीत व्हाल

सलमान खानने अजूनपर्यंत लग्न केले नाही. चाहत्यांना त्याच्या लग्नाची उत्सुकता आहे, मात्र सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांकडून याबद्दल अजून काहीही खुलासा झाला नाही. असे असतानाच आता सलमान खानच्या कुटुंबासंदर्भात एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.

ही बातमी म्हणजे सलमान खानच्या कुटुंबात आणखी एक घटस्फोट होणार आहे. सलमानचा भाऊ अरबाज खाननंतर आता सोहेल खाननेही पत्नी सीमा खानपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. ही बातमी सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे, चाहत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या दोघांनीही अचानकपणे विभक्त होण्याचा निर्णय का घेतला याची कोणालाही अजून कल्पना नाही. याबद्दल त्या दोघांना विचारले असता म्हणाले, विभक्त होण्याचा निर्णय दोघांचा असून तो आमचा खासगी प्रश्न आहे. तो खासगीच ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे असं दोघांकडून स्पष्ट सांगण्यात आलं.

घटस्फोटासाठी काल सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा खान हे दोघे फॅमिली कोर्टात पोहोचले होते, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोहेल आणि सीमा यांचे 1998 साली लग्न झाले आणि आता 24 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

माहितीनुसार, सीमा खानचं मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा बरोबर फॅमिली कनेक्शन आहे. सीमा खान कॉर्नरस्टोन स्पोर्ट एंड एंटरटेनमेंटचा मालक बंटी सजदेहची बहीण आहे. बंटी सजदेह आणि सीमा खान भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहचे चुलत भाऊ-बहिण आहेत. म्हणजेच नात्याने सीमा खान टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माची मेहुणी लागते.

एकीकडे सलमान खानचे अद्याप लग्न झालेले नसताना अरबाजनंतर सोहेलच्या घटस्फोटाची बातमी ऐकून खान कुटुंबीयांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. माहितीनुसार, अरबाज आणि मलायकाप्रमाणेच सोहेल आणि सीमानेही प्रेमविवाह केला होता. सोहेल आणि सीमा हे सध्या दोन मुलांचे पालक आहेत.

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now