Sohail Khan, Seema Sajdeh, Divorce/ जवळपास २४ वर्षांच्या लग्नानंतर सलमान खानचा (Salman Khan) भाऊ सोहेल खान (Sohail Khan) आणि त्याची पत्नी सीमा सजदेह (Seema Sajdeh) यांचा घटस्फोट झाला आहे. या जोडप्याने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्जही केला आहे. या दोघांचे लग्न मोडल्याची बाब समोर आल्यावर सर्वांनाच धक्का बसला. दोघे का वेगळे होत आहेत, याची माहिती आता समोर आली आहे.
सीमाने स्वतः पुढे येऊन पतीपासून वेगळे होण्याचे कारण सांगितले आहे. अलीकडेच सीमाने एका मुलाखतीत घटस्फोट घेण्याचे कारण सांगितले. सीमा म्हणाली, मी आता माझ्या आयुष्यातील अशा ठिकाणी पोहोचले आहे जिथे मला स्वतःसाठी निर्णय घ्यायचा होता. मला कोणाचीही पर्वा नाही आणि मला फक्त पुढे जायचे आहे, म्हणून मी हा मार्ग निवडला.
सीमा सजदेहने मुलाखतीत सांगितले की, मी माझ्या आयुष्याबद्दल सकारात्मक विचार करायला सुरुवात केली आहे. मला पुढे जायचे आहे आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे. एवढेच नाही तर मुले आणि कुटुंबीयांनाही माझ्या निर्णयाची माहिती आहे. ती म्हणाली, माझ्या कुटुंबाला हे समजले पाहिजे की मला माझ्या आयुष्यात सकारात्मक व्हायचे आहे. मी कोण आहे हे लोकांना कळले पाहिजे.
यापूर्वी तिच्या ‘द फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज’ या शोच्या पहिल्या सीझनमध्ये सीमाने सोहेलसोबतच्या तिच्या नात्याबद्दल खुलासा केला होता. ती म्हणाली होती, माझे त्याच्यावर प्रेम आहे, मी नेहमीच करेन. आमचे चांगले संबंध आहेत. पण कधी कधी तुमचे नाते वेगवेगळ्या दिशेने जातात. मी याबद्दल माफी मागत नाही कारण आम्ही आनंदी आहोत आणि माझी मुलेही आनंदी आहेत.
सोहेल खान आणि सीमा सजदेह यांनी १९९८ मध्ये लग्न केले होते. मुंबईतच दोघांची भेट झाली. सीमाला पाहताच सोहेल तिच्या प्रेमात पडला होता. दोघांची लवकरच मैत्री झाली आणि नंतर सीमाही सोहेलच्या प्रेमात पडली. त्यानंतर काही वर्षे डेटिंग केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा घरातील लोक तयार नव्हते, म्हणून त्यांनी पळून जाऊन लग्न केले.
हा तो काळ होता जेव्हा सोहेलचा ‘प्यार किया तो डरना क्या’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सोहेल-सीमा यांना निर्वाण आणि योहान ही दोन मुले आहेत. खान कुटुंबातील सोहेलच्या आधी अरबाज खानही त्याची पत्नी मलायका अरोरापासून विभक्त झाला आहे.
महत्वाच्या बातम्या-
सलमानचा भाऊ सोहेलकडून घटस्फोट घेणाऱ्या सीमा खानचे रोहित शर्माशी आहे जवळचे नाते; वाचून चकीत व्हाल
अभिनेता सोहेल खानचा पत्नी सीमाला घटस्फोट; २४ वर्षांपुर्वी पळून जाऊन केले होते लग्न
सोहेल खानसोबत संसार मोडणारी सीमा खान आहे मुंबई इंडियन्सच्या ‘या’ खेळाडूची मेहुणी, जाणून घ्या
सोहेल खानसोबतच्या घटस्फोटापुर्वी सीमा सचदेवने घेतला मोठा निर्णय, ऐकून सलमानही झाला थक्क