तामिळ अभिनेत्री दिव्यदर्शिनी नीलकंदा (Divyadarshini Nilakanda) हिने अलीकडेच अभिनेता शाहरुख खानची (Shah Rukh Khan) भेट घेतली आणि त्याला घट्ट मिठी मारली. इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना तिने किंग खानचे भरभरून कौतुक केले आहे. तिच्या इंस्टाग्राम पोस्टवरून तुम्ही अंदाज लावू शकता की दिव्यदर्शिनीला शाहरुखला भेटून किती आनंद झाला आहे.
दिव्यदर्शिनीने अलीकडेच चेन्नईतील अभिनेत्री नयनतारा आणि दिग्दर्शक विघ्नेश शिवन यांच्या लग्नात क्लिक केलेले फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये शाहरुखने पांढरा शर्ट आणि काळी पँट घातली आहे. दुसरीकडे, दिव्यदर्शिनीने मॅचिंग ब्लाउज आणि पारंपारिक दागिन्यांसह केशरी रंगाची साडी नेसली होती.
पहिल्या फोटोत शाहरुखने दिव्यादर्शिनीच्या खांद्यावर हात ठेवलेला दिसत आहे, ज्यामध्ये तो मनमोकळेपणाने हसताना दिसत आहे. दुसऱ्या चित्रात दिव्यदर्शिनी डोळे बंद करून शाहरुखला घट्ट मिठी मारताना दिसत आहे. त्यामध्ये तिच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत आहे.
दिव्यदर्शिनीने पोस्टला कॅप्शन दिले, “मी त्यांना घट्ट मिठी मारली आणि मला सांगायचे होते ते सर्व सांगितले, ‘किती वर्षे, किती आठवणी, किती आनंद सर तुम्ही आम्हाला दिलात, या सगळ्यासाठी तुम्ही फक्त सर्वोत्तम जीवनासाठी पात्र आहात’. दररोज मी तुमच्या आनंदासाठी प्रार्थना करेन सर. इंडस्ट्रीत ३० वर्षे पूर्ण होत आहेत. सर तुमच्या सारखे आधी आणि नंतर कोणीही नाही. खूप खूप धन्यवाद…
अभिनेत्री दिव्यदर्शिनीने तिच्या कॅप्शनमध्ये शाहरुख खानचे जोरदार कौतुक केले आहे. त्याचबरोबर त्याने किंग खानला त्याच्या आगामी ‘जवान’ या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टला दोन लाख युजर्सनी लाइक केले आहे. तसेच वेगवेगळ्या कमेंटही पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या-
मी Gay….; शाहरुख खानचा सोबत काम करणाऱ्या अभिनेत्रींसोबतच्या नात्याबाबत मोठा खुलासा
शाहरुख खानचा मॉन्स्टर लुक आला समोर , बहुचर्चित जवान चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित
मी जुही, काजोल, उर्मिला, शिल्पासोबत बेडवर शाहरुख खानने केला धक्कादायक खुलासा
शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाच्या निर्मात्यांनी या OTT प्लॅटफॉर्मसोबत केला करार, किंमत वाचून थक्क व्हाल