एका विवाहित महिलेवर प्रेम करणं एका परपुरुषाला चांगलच महागात पडलं आहे. तीन मुलांची आई असलेल्या महिलेसोबत शेजारी राहणाऱ्या तरुणाचं प्रेम जडलं. महिलेचा पती घरी नसताना तो तिच्या घरी यायचा, पतीला त्यांच्या प्रेमाबद्दल समजताच एक दिवशी त्यानं दोघांना रंगेहाथ पकडलं. मात्र, त्यानंतर यांची कहाणी अशी काही पलटली की, जणू तुम्हाला वाटेल ही एखाद्या सिनेमातील कहाणी असावी.
ही घटना बिहार मध्ये घडलेली आहे. एका जंगलात अनिलकुमार महतो नावाच्या व्यक्तीचं मृत शरीर सापडलं आणि आसपासच्या परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झालं. पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी आले आणि तपास सुरू केला. जेव्हा घटनेचा उलगडा झाला तेव्हा पोलिसांना देखील धक्का बसला.
अनेक धागेदोरे लावत तपास सुरू झाला, शेवटी पोलिसांच्या हाती जे आरोपी आले त्यांनी सांगितलेल्या जबाबामुळे पोलिसांना विश्वास ठेवावं की नाही असं वाटू लागलं. कारण क्राईमच्या प्रकरणात असं पहिल्यांदाज झालं असेल, जिथे पतीने पत्नीला इतर पुरुषाच्या सोबत एकत्र पाहिले आणि नंतर पतीच्या प्रेमापोटी तिनं प्रियकरालाच पतीसोबत मिळून मारलं.
घडलेली घटना म्हणजे, तरुणाचे शेजारी राहणाऱ्या तीन मुलांची आई असलेल्या महिलेवर प्रेम जडलं. दोघे एकमेकांवर प्रेम करू लागले. महिला देखील पतीच्या गैरहजेरीत त्याला आपल्या घरी बोलवत होती. हा तोच तरुण अनिलकुमार ज्याचा मृतदेह जंगलात पोलिसांना सापडला आणि एका मोठ्या क्राईमचा उलगडा झाला.
तर, ही महिला आणि पुरुष एक दिवशी नेहमीप्रमाणे महिलेच्या घरी गप्पा मारत होते, त्यानंतर त्यांच्यात रोमान्स सुरू झाला. घरात नसलेल्या महिलेच्या पतीला याबद्दल माहिती झाली. त्यानं लगेचच घर गाठलं. त्याला त्याची पत्नी अनिलकुमारच्या मिठीत दिसली. त्याला प्रचंड संताप आला.
अनिलकुमारला त्यानं जाब विचारायला सुरुवात केली, तर त्याला राग आला आणि तो महिलेच्या पतीवर धावून गेला. आपल्या नवऱ्यावर हल्ला होताना पाहून बायकोने आपल्या नवऱ्याची बाजू घेण्याचा निर्णय घेतला, ज्यानंतर या नवरा-बायकोनं मिळून प्रियकर अनिलकुमारचाच गळा आवळून त्याला संपवलं.
त्याची हत्या केल्यानंतर या नवरा-बायकोनं त्याचा मृतदेह जंगलात फेकून दिला. पोलिसांना आरोपी पती पत्नीची कहाणी ऐकल्यानंतर धक्का बसला. माहितीनुसार, महिलेचे आणि मृत अनिलकुमारचे गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यांनी सोबत पळून जाऊन लग्न करायचं देखील ठरवलं होतं.