Share

नातेवाईक पाठलाग करत असल्याचे पाहताच प्रेमीयुगुलाने उचलले धक्कादायक पाऊल, झाला भयानक शेवट

crime

वर्धा जिल्हातील समुद्रपूर तालुक्यात प्रेमप्रकरणातून एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत कुटुंबाच्या भितीने पळून गेल्यामुळे संबंधीत जोडप्याला आपले प्राण गमवावे लागले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, बेला येथील रहिवासी असणाऱ्या महेश शालिक ठाकरेचे गावातीलच एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर प्रेम जडले होते.

मात्र हे प्रेम घरचे मान्य करणार नाहीत म्हणून 25 मार्च रोजी या दोघांनी घरातून पळ काढला. इकडे घरच्यांनी दोघांचा तपास करण्यास सुरुवात केली. तीन चार दिवस बाहेर राहिल्यानंतर हे दोघे समुद्रपूर तालुक्यातील उमरी गावाजवळ एका शेतातील विहिरीत बसल्याची माहिती घरच्यांना लागली. त्यामुळे या दोघांना घेण्यासाठी घरचे विहिरीच्या ठिकाणी गेले.

परंतु घरचे आपल्याला पकडायला येतात याच्या भितीने दोघांनी विहिरीत उडी मारली. विहीरीत पाणी नसून गाळ असल्याने दोघांना विहिरीतून बाहेर निघता आले नाही. या दोघांच्या नाकातोंडात गाळ गेल्यामुळे त्यांचा विहिरीतच मृत्यू झाला. हा सर्व प्रकार दोघांच्या कुटुबींयानी आपल्या डोळ्यासमोर घडताना पाहिला.

पळून आलेली अल्पवयीन मुलगी इयत्ता नववीत शिकत होती. ती दोन वर्षांपूर्वी गुराखी असलेल्या महेशच्या प्रेमात पडली होती. यानंतर त्या दोघांनी शेवटपर्यंत सोबत राहिचे वचन घेतले होते. म्हणूनच महेशसोबत या अल्पवयीन मुलीने पळ काढला. परंतु शेवटी दोघांच्या अशा पध्दतीने अंत झाला. दरम्यान अल्पवयीन मुलगी पळून गेल्यामुळे तिच्या आईने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पोलीस या घटनेचा तपास करीत असतानाच सोमवारी कुटुंबीयांना हे दोघे जवळील गावात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यांचा पाठलाग करत कुटुंब दोघांपर्यंत पोहचले असताच त्यांनी एकमेकांच्या हातात हात घालून विहिरीत उडी मारली. कुटुंबीयांनी त्यांना वाचविण्याचा पूर्ण प्रयत्न केला मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.

आता या घटनेने संपूर्ण गाव हदरले आहे. पोलिसांनी या घटनेच्या तपासाला सुरुवात केली आहे. तसेच दोन्ही कुटुंबीयांच्या घरच्यांचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला आहे. महाराष्ट्रात प्रेम प्रकरणावरुन अशा अनेक हृदय हेलावून टाकणाऱ्या घटना घडल्या आहेत. कुटुंबाची भिती, नात्याचा स्विकार न करणे अशी कित्येत कारणे या घटनांना जबाबदार ठरली आहेत.

महत्वाच्या बातम्या
विद्यार्थी, नागरिकांना मोठा दिलासा; ठाकरे सरकार कोरोनाकाळात दाखल झालेले सर्व गुन्हे घेणार मागे
पुष्पातील श्रीवल्ली दिसतेस म्हणत तरूणीला मारली मिठी अन्.., पुण्यातील खळबळजनक प्रकार
‘आता गरिबांच्या पैशातून रस्त्यांची निर्मिती करणार’, नितीन गडकरींनी सांगितली योजना
कृषी पर्यटनाची गरज शेतकऱ्यांना व पर्यटकांना – गणेश चप्पलवार

इतर ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now