Share

जखमी मुलाच्या वेदना पाहून महिला IAS ढसा ढसा रडली, व्हिडीओ पाहून नेटकरीही झाले भावूक

उत्तर प्रदेशातील लखीमपूर जिल्ह्यात बस आणि ट्रकच्या अपघातात जखमींना भेटण्यासाठी आलेले लखनौचे विभागीय आयुक्त IAS रोशन जेकब यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, लहान मुलाची अवस्था पाहून आयएएस रोशन जेकब स्वतःच रडायला लागते. या व्हायरल व्हिडिओवर लोक रोशन जेकबचे कौतुक करत कमेंट करत आहेत.

जखमींची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचलेल्या रोशन जेकबला एक रडणारी आई मुलासोबत बसलेली दिसली. त्यानंतर तिने आईकडून मुलाची तब्येतीची विचारपूस करण्यास सुरुवात केली. पावसामुळे  घराची भिंत पडल्याने मुलगा जखमी झाल्याचे आईने सांगितले. भिंत पडल्याने त्यांच्या एका मुलाचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा मुलगा भिंतीखाली गाडला गेला होता.

भिंतीखाली गाडला गेलेल्या मुलाचा मणका तुटला आहे. हे सर्व ऐकून महिला अधिकाऱ्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. मुलाची अवस्था ऐकून घेतल्यानंतर आयुक्त रोशन जेकब यांनी भावुकतेने मुलाच्या पाठीवर हात ठेवून तू लवकर बरा हो, आम्ही तुला बरा करू, असे सांगितले. यादरम्यान लखनौ विभागाच्या आयुक्तांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या जिल्ह्याचे एडीएम, सीडीओ, सीएमओ आरडीएम यांना तातडीने मुलाला मदत करण्याच्या सूचना दिल्या.

यासोबतच पैसे खर्च करावे लागणार नाहीत, अशी ग्वाही त्यांनी कुटुंबीयांना दिली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोकांनी रोशनचे कौतुक करायला सुरुवात केली आणि सांगितले की इतर अधिकाऱ्यांनी त्याच्याकडून शिकण्याची गरज आहे. सूर्या शुक्ला नावाच्या वापरकर्त्याने लिहिले की, भावूक… लखनौचे विभागीय आयुक्त डॉ रोशन जेकब.

ग्यान प्रकाश नावाच्या ट्विटर हँडलवरून लिहिलं होतं की, “किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार… जीना इसी का नाम है”. या अश्रूंची इतिहासात नोंद झाली आहे. नव्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून शिकण्याची गरज आहे.

दिक्षा सिंह नावाच्या एका ट्विटर युजरने कमेंट केली की, ‘असे संवेदनशील आणि सर्वांशी जोडून राहणारे अधिकारी क्वचितच पाहायला मिळतील. लोकांच्या व्यथा पाहणे सर्वांनाच कुठे जमते? रोहित अग्रवाल नावाच्या ट्विटर युजरने लिहिले, तुम्ही संवेदनशील आहात हे पाहून आनंद झाला, इतरांच्या वेदना पाहून तुम्हाला त्रास होतो पण माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्यात चांगली ताकद आहे आणि तुम्ही या न्याय-व्यवस्थेला सुधारू शकता.

महत्वाच्या बातम्या-
वर्दीमध्ये सुंदरी! ‘या’ महिला IAS चं सौंदर्य पाहून मोठमोठ्या अभिनेत्रींना जाल विसरून, पहा फोटो
IAS अधिकाऱ्याची पुर्ण देशात चर्चा, भर पावसात गुडघाभर पाण्यात उतरून केली लोकांची मदत
jackfruit tree : ‘या’ २०० वर्षे जुन्या फणसाच्या झाडासमोर IAS-IPS होतात नतमस्तक, पाहण्यासाठी लोक करतात गर्दी

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now