चित्रकूट जिल्ह्यात ऑनर किलिंगची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अनोळखी व्यक्तीसोबत फोनवर बोलताना पाहून बापाने आपल्या मुलीला बेदम मारहाण केली. हे प्रकरण रायपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील इटावा ग्रामपंचायतीच्या चामरवा पूर्वा गावातील आहे. प्रत्येकाला आपला राग आवरता आला पाहिजे, अन्यथा त्या रागाचे रुपांतर कधी गुन्ह्यात होईल सांगता येत नाही. याचच एक उदाहरण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
काल रात्री नीतू नावाची मुलगी अज्ञात व्यक्तीशी फोनवर बोलत असताना अचानक तिचे वडील बाबोचा यांनी तिला फोनवर बोलताना पाहिले. त्यानंतर तिच्या वडिलांनी त्या अनोळखी व्यक्तीची विचारपूस करून त्याच्याशी बोलण्यासाठी फोन मागण्यास सुरुवात केली आणि मुलीने फोन न दिल्याने चिडलेल्या पित्याने मुलीला लाठ्याकाठ्याने मारहाण केली आणि तिचा मृत्यू झाला.
मुलीची हत्या केल्यानंतर वडील मंगळवारी तिचा मृतदेह जाळण्यासाठी घेऊन जात होते. तोपर्यंत पोलिसांना याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच आरोपी वडील घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला.
या प्रकरणी अतिरिक्त पोलिस अधीक्षक शैलेंद्र कुमार राय सांगतात की, रायपुरा पोलिस स्टेशनच्या पोलिसांना एका मुलीच्या मृत्यूची माहिती मिळाली होती. तिच्या वडिलांनी तिला मारहाण केल्याचा आरोप आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपींना अटक करून कारवाई केली जाईल.
महत्वाच्या बातम्या-
कसोटी चालू असताना स्टेडियममध्ये भारतीय चाहत्यांना केली शिवीगाळ, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
रवींद्र जडेजाने CSK ला ठोकला रामराम? केले असं काही की चाहत्यांनाही बसला धक्का
जपानच्या शिंजो आबेंची हत्या आणि अग्निपथ योजना, काय आहे दोघांमधील कनेक्शन? वाचून तुम्हीही हादराल
शाहरूखसोबत काम करण्यासाठी थालापती विजयने ठेवली ही& मोठी अट, चाहत्यांना बसेना विश्वास