Share

अन् नवरीला पाहून नवरदेव ढसाढसा रडू लागला; लग्नाला आलेले पाहुणेही झाले स्तब्ध

bride cry

सर्वत्र अलीकडेच आलिशान लग्नाचा ट्रेड सुरू झाला आहे. असे अनेक शूटचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. तसेच हेलिकॉप्टर मधून वधू- वरांची लग्नामध्ये इंट्री होते. इतकेच नाही तर नवरी बुलेट चालवून लग्न मंडपात इंट्री मारते. तर कुठे नवरी पारंपरिक पद्धतीने बैलगाडीतून लग्न मंडपात येते.

तसेच बैलगाडीतून देखील नवरीने लग्न मंडपात एन्ट्री मारलेला व्हिडिओ तुम्ही पाहिलेला असेलच. याचबरोबर अलीकडे सोशल मीडियावर दररोज असे अनेक व्हिडिओ (Video) व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या तूफान व्हायरल होतं आहे. भन्नाट डान्स करत नवरीने लग्न मंडपात धडाकेबाज एन्ट्री केली आहे.

मात्र नंतर जे घडलं ते पाहून लग्नातील पाहुणे मंडळी देखील स्तब्ध झालेले पाहायला मिळाले. तर जाणून घेऊया नेमकं काय आहे प्रकरण.. सध्या वर-वधूचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जेव्हा नवरी लग्न मंडपात एण्ट्री करते तेव्हा नवरदेव नवरीला पाहून भावूक होतो आणि रडू लागतो.

सोशल मीडियावर लोकांना हा व्हिडिओ प्रचंड आवडला आहे. bridal_lehenga_designn नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, नवरदेव स्टेजवर उभा आहे. मग नवरी एण्ट्री करते. वधूला पाहून नवरदेव अचानक भावूक होतो आणि रडू लागतो.

त्यानंतर दोघेही एकमेकांना मिठी मारताना पाहायला मिळत आहे. तसेच नवरी ‘i love you’ देखील म्हणत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे, त्याच्याशीच तुम्ही लग्न करता तो आनंदही घेऊन येतो. कोणाला तरी टॅग करा.” सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
झुंड, पावनखिंड चित्रपटांच्या निमित्ताने महाराष्ट्रात पुन्हा उफाळला ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद
पियुष जैनच्या जप्त केलेल्या पैशांची SBI मध्ये केली एफडी, तासाला मिळतंय तब्बल ‘एवढं’ व्याज
अमूलसोबत कमाई करण्याची संधी! २ लाखात सुरू करा बिझनेस आणि महिन्याला होईल ५ लाखांची कमाई
धक्कादायक! रशियाने जाहीर केली शत्रू देशांची लिस्ट, युक्रेनसह ‘या’ ३१ देशांचा आहे समावेश

इतर ताज्या बातम्या मनोरंजन राज्य

Join WhatsApp

Join Now