Nora Fatehi, Social Media, Video/ अभिनेत्री नोरा फतेहीचे (Nora Fatehi) सौंदर्य पाहून भलेभले घायाळ होतात. नोरा जिथे जाते तिथे ती तिची छाप सोडते. अलीकडेच, अभिनेत्री एका ठिकाणी जात असताना तिच्या चाहत्यांच्या गर्दीने तिला घेरले. हा क्षण कोणत्याही अभिनेत्रीसाठी भीतीदायक असू शकतो, परंतु नोराने (Nora Fatehi Video) तिचा संयम गमावला नाही आणि शांतपणे फोटो काढल्यानंतर ती निघून गेली.
नोराची गर्दी हाताळण्याची पद्धत लोकांना आवडली आहे. नोराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर नोरा फतेहीचा हा व्हिडिओ पाहून अनेकांनी तिचे कौतुकही केले आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीला चाहत्यांनी घेरलेलं दिसत आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की नोरा एयरपोर्ट जात असताना एक चाहता तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी येतो. पण हळूहळू अभिनेत्रीसोबत फोटो काढण्यासाठी लोकांची गर्दी जमते आणि अभिनेत्री खूपच अस्वस्थ दिसते. या गर्दीतून बाहेर पडण्यासाठी अभिनेत्री कशी धडपड करते हे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
नोरा फतेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचा सिझलिंग अवतार दिसत आहे. नोराने बॅकलेस ब्लॅक कलरचा हॉट आउटफिट परिधान केला होता आणि हलक्या मेकअपसह तिचे केस खुले ठेवले होते.
या व्हिडिओमध्ये नोरा एकापेक्षा एक सेक्सी पोज देताना दिसत आहे. नोरा फतेहीला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. आपली प्रतिमा आणि मेहनतीमुळे तिने चित्रपटसृष्टीत खूप उच्च स्थान मिळवले आहे. ती केवळ एक जबरदस्त डान्सर नाही तर तिने स्वत:ला एक उत्तम अभिनेत्री म्हणूनही सिद्ध केले आहे.
आता पाहायला गेल तर तिची फॅन फॉलोइंग प्रचंड आहे. जगभरात तिचे चाहते आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. नोराची गाणीही सुपरहिट ठरली आहेत.
महत्वाच्या बातम्या-
नोराच्या स्टाईलने वाढवले स्टेजचे तापमान, शेजारी उभ्या असलेल्या रणवीरलाही फुटला घाम
जेव्हा डान्स करणाऱ्या नोरा फतेहीला चप्पलने मारू लागली आई, व्हायरल झाला व्हिडीओ
लग्नानंतरही नोरा फतेहीसोबत.., पायल रोहतगीने प्रिंस नरूलाची केली पोलखोल, प्रेक्षकही झाले अवाक
PHOTOS: या आहेत भोजपुरीच्या टॉप १० ग्लॅमरस अभिनेत्री; सनी लिओनी, नोरा फतेहीही पडतील फिक्या