Share

माझी सुंदरता पाहून पोलिसांनी मला अटक केली अन् केला बलात्काराचा प्रयत्न, महिलेचा गंभीर आरोप

एयरपोर्टवरील हॉटेलमध्ये जेवण करूनही बिल न भरल्याचा आरोप एका महिलेवर केला आहे. त्यानंतर पोलीस तेथे पोहोचले आणि तिला अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी(Police) आपल्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा महिलेने केला. वास्तविक, हे अमेरिकेचे प्रकरण आहे. हैंड बस्तामी(Hand Bastami) असे या 28 वर्षीय महिलेचे नाव आहे. ती एक हॉस्पिटॅलिटी प्रोफेशनल आहे, ती यापूर्वी एका गांजा कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर होती.(seeing-my-beauty-the-police-arrested-me-and-tried-to-rape-me)

एका अहवालानुसार, लास वेगास मेट्रोपॉलिटन पोलिसांनी सांगितले की त्यांना अहवाल मिळाल्यानंतर बस्तामीला गेल्या आठवड्यात हॅरी रीड इंटरनॅशनल एयरपोर्टवरून(Hari rid international airport) गैरवर्तनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. पोलिसांना सांगण्यात आले की महिलेने विमानतळाच्या आत असलेल्या चिलीज रेस्टॉरंटमध्ये जेवण केले, परंतु ती त्यासाठी पैसे देत नव्हती.

जेव्हा पोलिस अधिकारी एयरपोर्टवर पोहोचले तेव्हा त्यांनी बस्तामीला सिक्योरिटी चेक पॉईंटजवळ भांडताना पकडले. बस्तामीला ताब्यात घेत असताना महिलेने त्यांच्यावर थुंकण्याची धमकी दिली आणि शिवीगाळही केली. यादरम्यान या महिलेने दावा केला की, पोलिसांनी आपल्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला कारण त्यांनी यापूर्वी इतकी सुंदर महिला पाहिली नव्हती.

ही घटना 31 ऑगस्ट रोजी घडली, जेव्हा लास वेगास मेट्रोपॉलिटन(Vegas Metropolitin) पोलिस बस्तामीच्या शोधात एयरपोर्टवर पोहोचले. बस्तामी विरुद्ध लास वेगास म्युनिसिपल कोर्टाचे वॉरंट देखील होते.

बस्तामीच्या विरोधात पोलिसांना अहवाल मिळताच पोलीस तिला अटक करण्यासाठी पोहोचले, रिपोर्टनुसार, अटकेच्या वेळी बस्तामी दारूच्या नशेत होती. बस्तामीला अटक करून क्लार्क काउंटी डिटेन्शन सेंटरमध्ये नेण्यात आले आहे. तिला सुमारे 80,000 रुपयांच्या ($1,000) जामीनावर सोडले जाऊ शकते.

इतर आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now