Share

Ishan Kishan: आधी पाया पडला अन् म्हणाला, ‘काकू जेवायला कधी घालणार?’ ईशानचा साधेपणा पाहून चाहत्यांना आली धोनीची आठवण

Mahendra Singh Dhoni, Ishan Kishan, Wicketkeeper, Ranchi/ महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) रूपाने रांचीने जगाला महान क्रिकेटपटू दिला. आता तरुण ईशान किशन (Ishan Kishan) त्याच रांचीचे नाव रोशन करत आहे. हा हुशार यष्टिरक्षक (wicketkeeper) टीम इंडियासाठी खेळत असून रविवारच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्यातही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

रांचीच्या जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये त्याने 84 चेंडूत 4 चौकार आणि 7 षटकारांसह 93 धावा केल्या. त्याचे शतक हुकले, पण त्याने टीम इंडियासाठी आपले 100% दिले आहे. झंझावाती फलंदाजीपेक्षा त्याने सामन्यानंतर काय केले याचीच अधिक चर्चा होत आहे. वास्तविक, तो सामना संपल्यानंतर त्याच्या चाहत्यांना भेटला.

यादरम्यान तो एक महिला आणि एक पुरुष कर्मचाऱ्यांना भेटला. त्याने आधी त्यांच्या पायाला स्पर्श केला आणि नंतर फोटो काढला. जाताना त्याने विचारले, आंटी खायला कधी घालणार. इशान किशनसोबत फोटोत दिसणारी महिला म्हणते, “मी म्हणाले होते ना, तू एवढा जोरात शॉट मार की माझ्या घराची काच फुटेल, आज तू तेच केल बेटा”, यावर ईशान हो म्हणाला.

ईशान किशन निघायला लागतो, पण तो रिकाम्या हाताने जात नाही, हातात एक कागद धरतो, जो तो कॅमेराकडे धरून दाखवतो, ज्यावर लिहिले होते, “शार्दुल ठाकूर 54”. हे दाखवत ईशान म्हणतो, “फक्त मला इथे प्रेम मिळतं अस नाही. क्रिकेट चाहते सर्वांना खूप प्रेम देत आहेत.

https://twitter.com/BCCI/status/1579170323580084224?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1579170323580084224%7Ctwgr%5Ee095fc84090a12f4a4097e493f08c5966afb8af3%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Fsports%2Fcricket%2Findia-vs-south-africa%2Fishan-kishan-touched-feet-of-old-lady-fan-in-ranchi-and-asked-aunty-for-invitation-ind-vs-sa%2Farticleshow%2F94749966.cms

त्यानंतर तो एका क्रिकेट चाहत्याने दिलेली एक चिठ्ठी दाखवतो आणि म्हणतो, “तो चाहता मला वारंवार विनंती करत होता की, कृपया ही चिठ्ठी शार्दुल ठाकूरला द्या. मी म्हणालो यार घेऊन ये…” इशान किशन म्हणाला की मी शार्दुल ठाकूरला एक विशेष नोट दिली आहे. शार्दुल ठाकूरने आपल्या चाहत्याचे आभार मानले आणि भेटवस्तू छातीशी लावून पोझ दिली.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 7 गडी गमावून 278 धावा केल्या. मोहम्मद सिराजने 3 विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने श्रेयस अय्यरच्या नाबाद 113, इशान किशन 93 आणि संजू सॅमसनच्या नाबाद 30 धावांच्या जोरावर हा सामना 7 गडी राखून जिंकला. यासह मालिकाही 1-1 अशी बरोबरीत आली आहे.

महत्वाच्या बातम्या-
VIDEO: अर्जुन तेंडुलकरच्या रॉकेट रॉर्करने १५ कोटींचा इशान किशनही झाला बोल्ड, क्षणात उडवले स्टंप
त्याने कॅच सोडला म्हणून सामना हारलो नाही तर.., श्रेयस अय्यरच्या समर्थनार्थ इशान किशन मैदानात
रोहित किंवा राहुलच्या जागी संघात जागा पाहिजे का? इशान किशनचे उत्तर ऐकून सगळेच झाले थक्क

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now