महाराष्ट्रात ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या टीझरची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या चित्रपटात शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची भूमिका अभिनेता प्रसाद ओकने साकारली आहे. शुक्रवारी मुंबईत या चित्रपटातील गाण्याचा लाँचिंग सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाला चित्रपटातील कलाकारांनी आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी आनंद दिघे यांच्या भूमिकेत प्रसाद ओकला पाहून एकनाथ शिंदे भावून झालेले दिसून आले. प्रसाद ओकला आनंद दिघे यांच्या रूपात पाहून शिंदे नतमस्तक झाले.
एकनाथ शिंदे सर्वांसमोर प्रसाद ओकच्या पाया पडले. हा प्रसंग सर्वात जास्त भावूक करणारा ठरला. प्रसाद ओकच्या रुपात आपल्यासोबत आनंद दिघे असल्याचा भास शिंदे यांना यावेळी झाला. यानंतर शिंदे यांनी प्रसाद ओकसोबत अनेक फोटो काढले. तसेच आनंद दिघे यांच्या व्यक्तिरेखेसाठी करण्यात आलेल्या मेकअपचे कौतूक शिंदेंनी केले.
सध्या व्यासपीठावर घडलेल्या या प्रसंगाची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. यानिमित्ताने आनंद दिघे यांचे एकनाथ शिंदेंसोबतचे जूने फोटो व्हायरल झाले आहेत. असे म्हणले जाते की, आनंद दिघे यांचे बोट धरून एकनाथ शिंदे राजकारणात आले. शिंदेंच्या यशामध्ये दिघे यांचा खूप मोठा वाटा आहे.
१९९७ साली आनंद दिघे यांनी शिंदेंना महानगरपालिकेच्या निवडणुकीचे तिकीट दिले होते. या निवडणुकीत शिंदे निवडूनही आले होते. शिंदेंना ठाणे महापालिकेचे सभागृह नेतेपद दिघे यांनीच दिले होते. त्यामुळे शिंदे यांच्या यशामध्ये दिघेंचा खूप मोलाचा वाटा आहे.
दरम्यान ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाला लोकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या चित्रपटाच्या टीझरने एका आठवड्यात सोशल मीडियावर सत्तर लाखांहून अधिक व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
CSK Vs MI : ‘धोनी शांत राहून गेम करतो’, सातव्या पराभवानंतर रोहितने सांगितलं पराजयाचं कारण
टप्प्यात कार्यक्रम करणारे जयंत पाटील मिटकरींच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याने आले अडचणीत; म्हणाले..
सुशांत सिंह राजपूतपासून ते सिद्धार्थ शुक्लापर्यंत, या कलाकारांनी मृत्यूनंतर दान केली त्यांची संपत्ती
दाक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर का यशस्वी होतात? संजय दत्तने सांगितले कारण