Share

विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळेच्या शाही लग्नाचे खास फोटो; एकदा बघाच

Virajas Kulkarni

मराठमोळा अभिनेता विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) नुकतीच त्याची प्रेयसी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळेसोबत (Shivani Rangole) विवाहबंधनात अडकला आहे. ३ मे रोजी अक्षय्य तृतीयाच्या शुभमुहुर्तावर दोघांनी लग्नगाठ बांधली. पारंपारिक मराठमोळ्या अंदाजात कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत त्यांचा हा विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या या लग्नाची मराठी मनोरंजनसृष्टीत जोरदार चर्चा झाली.

विराजस आणि शिवानीच्या लग्नाचे फोटो समोर येताच त्यांच्यावर चाहते आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यादरम्यान मिसेस विराजस कुलकर्णी अर्थात अभिनेत्री शिवानी रांगोळेने तिच्या लग्नातले काही न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत. तर हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

शिवानीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर हे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये पहिल्या फोटोत शिवानी नववधूच्या रूपात खूपच सुंदर दिसत आहे. लाल रंगाची सिल्क साडी त्यावर साजेसे दागिने, डोक्याला मुंडावळ्या, केसात गजरा, नाकात नथ अशा मराठमोळ्या लूकमध्ये शिवानी कमालीची सुंदर दिसत आहे.

दुसऱ्या फोटोत शिवानी आणि विराजस लग्नाचा आणाभाका घेतल्यानंतर डान्स करताना दिसून येत आहेत. यावेळी दोघांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. तिसऱ्या फोटोत वरमालेच्या वेळी शिवानी आणि विराजसला पाहुण्यांनी वर उचलल्याचं दिसून येत आहे. यामध्ये अनेक पाहुणे हा आनंदाचा क्षण त्यांच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करत असल्याचेही दिसून येत आहे.

शिवानीने शेअर केलेल्या शेवटच्या फोटोत विराजस आणि ती दिलखुलासपणे हसताना दिसून येत आहेत. यावेळी निमित्त काय होतं हे माहित नाही. परंतु दोघेही या फोटोत खळखळून हसताना दिसून येत आहेत. याशिवाय विराजस आणि शिवानीने लग्नानंतर खास फोटोशूटही केलं होतं. हे फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान, शिवानी आणि विराजस पहिल्यांदा एका नाटकादरम्यान भेटले होते. शिवानी एका इंग्रजी नाटकात काम करत होती तर विराजस त्या नाटकाचे दिग्दर्शन करत होता. या नाटकादरम्यान त्या दोघांची चांगली मैत्री झाली. आणि नंतर त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

विराजस कुलकर्णी हा मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. त्याने झी मराठी वाहिनीवरील माझा होशील ना या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेतील आदित्य या पात्राद्वारे तो घराघरात पोहोचला. एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच विराजस उत्तम दिग्दर्शकसुद्धा आहे.

विराजसने यापूर्वी अनेक नाटक आणि लघुपटांचे दिग्दर्शन केले. तर आता ‘व्हिक्टोरिया’ या चित्रपटाद्वारे तो पहिल्यांदाच चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. नुकतीच या चित्रपटाचे चित्रीकरण स्कॉटलँड येथे पूर्ण झाले असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दुसरीकडे शिवानीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मालिकेत रमाबाईंची भूमिका साकारली होती. मालिकेतील आपल्या सहजसुंदर अभिनयाद्वारे तिने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले होते. यासोबत तिने आम्ही दोघी, यलो, चिंटू २ अशा चित्रपटातही काम केले. याशिवाय तिने स्टार प्रवाह वाहिनीवरील सांग तू आहेस का या मालिकेत सिद्धार्थ चांदेकरसोबत दिसली होती.

मनोरंजन ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now