Share

कमाईच्या बाबतीतही वरचढ निघाले साऊथचे सुपरस्टार; एका चित्रपटासाठी घेतात तब्बल ‘एवढे’ कोटी

South Indian

सध्या दाक्षिणात्य चित्रपटांची (South Indian) खूप चलती असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळायला आहे. ‘बाहुबली’, ‘केजीएफ’, ‘जय भीम’, ‘पुष्पा’नंतर आता ‘आरआरआर’, अशा अनेक दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटांनी जुने रेकॉर्ड तोडत नवीन विक्रम रचला. तर या चित्रपटांसोबतच आता दाक्षिणात्य कलाकारही पॅन इंडिया स्टार म्हणून उदयास येत आहेत. आपल्या चित्रपटाद्वारे बॉलिवूड सिनेसृष्टीला आव्हान देण्यासोबतच हे दाक्षिणात्य कलाकार आता मानधनाच्या बाबतीतही बॉलिवूड कलाकारांना टक्कर देत आहेत. तर आज या लेखाद्वारे दक्षिणेकडील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांविषयी जाणून घेऊया.

१. प्रभास –

अभिनेता प्रभास हा ‘बाहुबली’ चित्रपटानंतर पॅन इंडिया स्टार बनला. ‘बाहुबली’नंतर त्याने ‘साहो’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. परंतु त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. त्यानंतर त्याचा ‘राधेश्याम’ हा चित्रपटही काही कमाल करू शकला नाही. हिंदीत सलग दोन चित्रपट फ्लॉप झाले असले तरी प्रभासचा स्टारडम काही कमी झाला नाही. रिपोर्टनुसार प्रभासने त्याच्या आगामी ‘आदिपुरूष’ या चित्रपटासाठी १५० कोटी फी आकारली आहे. यानुसार तो भारतातील सर्वात महागडा अभिनेता बनला आहे.

२. अल्लू अर्जून –

दक्षिणेकडील स्टायलिश स्टार अल्लू अर्जून आता देशभरात आयकॉन स्टार म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. अल्लू अर्जूनची स्टारडम खूप मोठी आहे. रिपोर्टनुसार ‘पुष्पा’ चित्रपटासाठी त्याने ५० कोटी रूपये फी आकारली आहे. तर चित्रपटाला मिळालेल्या भरघोस यशानंतर आता त्याने आपल्या मानधनात वाढ केल्याचे सांगण्यात येत आहे.

३. धनुष –

धनुष तमिळ सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. तमिळसोबत बॉलिवूडमध्येही त्याने आपला धबधबा निर्माण केला आहे. ‘रांझणा’ चित्रपटानंतर ‘अतरंगी रे’द्वारे त्याने हिंदी प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. रिपोर्टनुसार तो एका चित्रपटासाठी २० ते २५ कोटी रूपये फी आकारतो.

४. सूर्या –

‘सिंघम’ स्टार अभिनेता सूर्याची फॅनफॉलोइंगही खूप मोठी आहे. त्याचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करतो. रिपोर्टनुसार सूर्या एका चित्रपटासाठी ३५ ते ४५ कोटी रूपये घेतो.

५. यश –

कन्नड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता यशचा ‘केजीएफ चॅप्टर २’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिपोर्टनुसार ‘केजीएफ २’ साठी यशने ३० कोटी रूपयांची मोठी रक्कम आकारली आहे. तर ‘केजीएफ’प्रमाणे ‘केजीएफ २’ सुद्धा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई करेल, अशी आशा निर्मात्यांना आहे.

६. विजय –

तमिळ सिनेसृष्टीतील आणखी एक सुपरस्टार म्हणून थलपती विजयला ओळखले जाते. विजयचा ‘बीस्ट’ हा चित्रपट १३ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. तर रिपोर्टनुसार विजयने या चित्रपटासाठी १०० कोटी रूपये फी आकारली आहे. तर दुसरीकडे अशाही बातम्या समोर येत आहेत की, कोरोना काळात झालेला नुकसान लक्षात घेता विजयने त्याच्या फीमध्ये ३० टक्के कपात केली आहे. त्यामुळे त्याची फी आता १०० कोटीवरून ७० कोटी रूपये झाली आहे.

https://www.instagram.com/p/Cb5NWn6vDbY/

७. ज्यूनियर एनटीआर आणि रामचरण –

‘आरआरआर’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात अभिनेता ज्यूनियर एनटीआर आणि रामचरण आपल्या जबरदस्त अभिनयाद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकत आहेत. तर रिपोर्टनुसार ‘आरआरआर’साठी या दोघांना ४५ कोटी रूपये मानधन मिळाले आहे. तर या चित्रपटाच्या यशानंतर हे दोन्ही स्टार्स त्यांच्या मानधनात वाढ करण्याची शक्यता आहे.

८. रजनीकांत –

दाक्षिणात्य सिनेसृष्टीत देवाप्रमाणे पूजिले जाणारे अभिनेते रजनीकांत आशिया खंडातील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांचे चित्रपट लोक अशरक्षः डोक्यावर घेतात. रिपोर्टनुसार रजनीकांत एका चित्रपटासाठी ११० कोटी रूपये फी आकारतात.

महत्त्वाच्या बातम्या :
पार्टीनंतर मी पूजा भट्ट, रवीना टंडन, विक्रम, राहुल रॉयचा ड्रायव्हर व्हायचो, दीप तिजोरींचा खुलासा
पैसा अन् प्रसिद्धी मिळताच माझं डोकं फिरलं होतं; ‘कच्चा बदाम’फेम भुबन बड्याकरची कबुली
‘बाळूमामा’च्या सेटवर राडा, सेट निर्मात्याचा मोडला पाय, लाथा बुक्क्यांनी केली मारहाण; वाचा नेमकं काय घडलं?

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now