Share

शाहरूखचा बहुचर्चित पठाण ‘या’ दिवशी होणार रिलीज, टीझर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Pathan

बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘पठाण’ (Pathan Movie) हा चित्रपट पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आपल्या आवडत्या किंग खानला दीर्घकाळानंतर पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यादरम्यान चाहत्यांची ही उत्सुकता कायम ठेवत चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. शाहरूखने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर हा टीझर शेअर केला आहे.

शाहरूखने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर पठाण चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. या टीझरमध्ये शाहरूखचा वेगळा लूक पाहायला मिळत आहे. पठाणच्या लूकमध्ये शाहरूख दमदार अंदाजात यामध्ये दिसून येत आहे. याशिवाय या टीझरमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता जॉन अब्राहमसुद्धा दिसत आहेत. दोघेही यामध्ये पठाण भूमिकेविषयी सांगताना दिसून येत आहेत. हा टीझर शेअर करत शाहरूखने चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेचीही घोषणा केली आहे.

टीझरसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मला माहित आहे की, उशीर झालाय. पण तारीख लक्षात ठेवा. पठाणचा वेळ आता सुरु झालाय. भेटुया २५ जानेवारी २०२३ रोजी सिनेमागृहात. चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये प्रदर्शित होणार आहे. जवळच्या चित्रपटगृहात नक्कीच पठाण चित्रपट पहा’. ‘पठाण’ या चित्रपटाचा हा टीझर पाहून चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

दरम्यान, ‘पठाण’ हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. यामध्ये शाहरुख खान एका जासूसच्या भूमिकेत दिसणार आहे. सिद्धार्थ आनंद या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार चित्रपटाचे बजेर २०० कोटी रूपये आहे. शाहरूखने यापूर्वी अनेक बिग बजेट चित्रपटात काम केला आहे. परंतु या चित्रपटाची चाहत्यांची उत्सुकता चाहत्यांमध्ये अधिक दिसून येत आहे.

तब्बल पाच वर्षानंतर होणार शाहरूखचे पडद्यावर पुनरागमन

‘पठाण’ हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार असेल तर याद्वारे शाहरूख तब्बल ५ वर्षांनी पडद्यावर पुनरागमन करणार. यापूर्वी तो २०१८ साली आलेल्या ‘झीरो’ या चित्रपटात शेवटचा दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत होते. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. त्यानंतर शाहरूखने काही काळासाठी चित्रपटातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला.

पुन्हा पडद्यावर पहायला मिळणार शाहरूख-दीपिकाची केमिस्ट्री

या चित्रपटाद्वारे शाहरूख खान आणि दीपिका पादुकोण यांची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘ओम शांती ओम’, ‘चेन्नई एक्सप्रेस’ आणि ‘हॅप्पी न्यू ईअर’ मधील त्यांच्या केमिस्ट्रीला चाहत्यांची पसंती मिळाली होती. तर आता ‘पठाण’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी ते सज्ज आहेत. शाहरूख खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमशिवाय या चित्रपटात सलमान खानसुद्धा दिसणार आहे. सलमान खान या चित्रपटात केमियो करणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
तारक मेहता फेम नट्टू काकांची शेवटची इच्छा ऐकून मुलालाही बसला होता धक्का
‘पावनखिंड’ ओटीटीवर प्रदर्शित का नाही केला? चिन्मय मांडलेकरच्या उत्तराने जिंकली लोकांची मनं
PHOTO: अर्जुन कपूरच्या बहिणीने वजन घटवून सगळ्यांनाच केले चकीत, आता दिसते खुपच सुंदर आणि हॉट

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now