Share

रोहित राऊत-जुईली जोगळेकरला लागली हळद; पहा क्यूट कपलचे क्यूट फोटो

rohit raut and juilee joglekar haldi

मराठीतील प्रसिद्ध गायक रोहित राऊत आणि त्याची गर्लफ्रेंड जुईली जोगळेकर उद्या २३ जानेवारी रोजी लग्नगाठ बांधणार आहेत. दोघांच्या लग्नाची जय्यत तयारी करण्यात आली असून रोहित आणि जुईली त्यांच्या लग्नासाठी फारच उत्सुक आहेत. नुकताच या दोघांचा साखरपुडा समारंभ पार पडला. यादरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर आता या दोघांच्या हळदी समारंभाचे (rohit raut and juilee joglekar haldi) फोटो समोर आले आहेत.

रोहित आणि जुईलीच्या फॅनपेजवर त्यांच्या हळदी समारंभाचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहेत. यामध्ये दिसत आहे की, रोहित आणि जुईलीने हळदी समारंभासाठी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान न करता पांढऱ्या रंगाच्या कपड्यांना पसंती दिली आहे. तसेच त्यांचे कुटुंबीय आणि मित्रमंडळीही पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसून येत आहेत.

https://www.instagram.com/p/CZBy6FspjZf/

समोर येत असलेल्या फोटो आणि व्हिडिओद्वारे लक्षात येत आहे की, रोहित आणि जुईलीच्या हळदी समारंभावेळी सर्वांनी खूपच धमाल केली. यापूर्वी रोहित आणि जुईलीच्या साखरपुडा आणि मेहंदी समारंभाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावेळीही सर्वांनी खूप धमाल केल्याचे पाहायला मिळाले.

https://www.instagram.com/p/CZByemuKhLp/

रोहितनेही त्याच्या साखरपुडा समारंभाचे फोटो इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केले होते. या फोटोंमध्ये रोहित आणि जुईली फारच खूश दिसून आले. तसेच फोटो शेअर करत रोहितने लिहिले की, ‘रॉसला राचेल मिळाली, राजला सिमरन मिळाली आणि शेवटी रोहितला जुईली मिळाली’.

रोहित-जुईलीच्या या खास क्षणांच्यावेळी त्यांची मैत्रीण आणि अभिनेत्री मिताली मयेकरसुद्धा उपस्थित आहे. रोहित-जुईलीच्या प्रत्येक कार्यक्रमात मिताली उत्साहाने सामील होत आहे. तसेच यादरम्यानचे फोटोही ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसून येत आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांकडूनही खूप पसंती दिली जात आहे.

रोहित आणि जुईली दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही नेहमी एकमेकांसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी शेअर करत असतात. मकर संक्रातीच्या दिवशी त्या दोघांनी एकमेकांसोबतचा एक फोटो शेअर करत लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची हिंट दिली होती. मात्र, त्यांनी लग्नाची तारीख घोषित केली नव्हती.

रोहित-जुईलीने लग्नाची तारीख घोषित केली नसली तरी त्यांच्या पोस्टवरून ते दोघे २३ जानेवारी रोजी लग्न करणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. तर आता दोघेही खरोखरच उद्या आयुष्यभरासाठी एकमेकांचे साथी होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :
अमोल कोल्हेंच्या समर्थनार्थ नाना पाटेकर मैदानात; म्हणाले, नथुराम गोडसेची भूमिका साकारणं म्हणजे…
रोहित राऊत-जुईली जोगळेकरची लगीनघाई; साखरपुडा समारंभाचे फोटो आले समोर
नीना गुप्ता यांच्या उत्तराने कपिलची बोलती झाली बंद; म्हणाल्या, माझे इतके मोठे बुब्स नाहीत मग..

 

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now