student : अलीकडे शाळेत अनेक धक्कादायक घटना घडत असल्याचं पाहायला मिळतं आहे. हे सांगण्याच कारण म्हणजे, नुकतच एक धक्कादायक उघडकीस आलं आहे. दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा वर्गातच मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. परिसरात देखील हळहळ व्यक्त केली जातं आहे.
वाचा नेमकं घडलं काय?
नवी दिल्लीतील हि घटना असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रोहिणी भागातील एका सरकारी शाळेतील आहे. अचानक वर्गात बसलेल्या दुसऱ्या वर्गातील मुलाचा मृत्यू झाला. मात्र मुलाच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेलं नाहीये.
याबाबत बोलताना शाळेतील विद्यार्थ्यांनी सांगितलं की जेव्हा शिक्षक वर्गात आले तेव्हा त्यांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली, मुलगी उभी राहिली आणि म्हणाली की मी उत्तर देते. मात्र शिक्षकाने दुसऱ्या मुलीला प्रश्न विचारला. शिक्षक दुसर्या मुलीला प्रश्न विचारत असल्याने ती नाराज झाली.
अन् बघता बघता अचानक विद्यार्थिनीने शेजारी बसलेल्या विद्यार्थिनीचा हात पकडला आणि नंतर ती अचानक खाली पडली. तिला रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होतं. या घटनेने शाळेत देखील भीतीचे वातावरण पसरले आहे. कुटुंबियांवर देखील दु: खाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना अद्याप नेमकं काय घडलं? याची माहिती मिळाली नाहीये. मात्र या घटनेने एकच खळबळ उडाली असून पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करतं आहेत. काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली होती.






