कर्नाटकमध्ये हिजाबविरुद्ध भगवा वाद चिघळला आहे. ही परिस्थिती पाहता राज्यातील सर्व शिक्षणसंस्था ३ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने दिला आहे. हिजाब बंदीवरून कर्नाटकामध्ये विविध ठिकाणी काही गटांमध्ये वादावादी झाली.(School and college closed for three days in Karnataka)
हिजाब बंदीचे प्रकरण न्यायालयात गेले असून याप्रकरणी बुधवार पर्यंत सुनावणी तहकूब केली आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक तसेच सर्व नागरिकांना शांतता राखण्यास सांगितली आहे.
शिमोगातील एका महाविद्यालयात एक विद्यार्थी जागेवर भगवा ध्वज फडकवतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. इथे दगडफेकीनंतर जमावबंदी लागू आहे, तर उडप्पी येथे हिजाब घातलेल्या मुलींनी महाविद्यालयात प्रवेश केला.
त्याचवेळी भगव्या रंगाचा स्कार्फ गुंडाळलेले काही मुले आणि मुली तिथे दाखल झाले. दोन्ही गटांमध्ये वादावादी झाली. बागलकोटमध्येही दगडफेक झाली. त्यानंतर पोलीसांनाही लाठीमार करावा लागला.
हा वाद वाढत असल्याचे पाहून राज्य सरकारने तीन दिवस सर्व शिक्षण संस्था बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. उडप्पी विद्यालयातील काही विद्यार्थीनींनी हिजाब परिधान केल्यामुळे त्यांचा वर्गात प्रवेश नाकारण्यात आला होता.
त्याविरोधात त्या मुलींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हिजाब घालू न देणे हे मुलभूत अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचे त्या मुलीने सांगितले आहे. यामुळेच त्या मुलीने उच्च न्यायालयाकडे याचिका दाखल केली आहे.
महत्वाच्या बातम्या
एकाच आघाडीचे भाग बनले काँग्रेस आणि भाजप; आता एकत्र मिळून चालवणार सरकार
१७८८ खोल्यांच्या महालात राहणाऱ्या सुलतानच्या लेकीचा भव्यदिव्य विवाहसोहळा, फोटो पाहून अवाक व्हाल