Share

ज्युस पिल्यामुळे तोंडापासून ते पोटापर्यंत पडले चट्टे; महिलेचा झाला मृत्यू, परिसरात खळबळ

फळांचा ज्युस पिणे आरोग्यास लाभदायक असते, असे म्हंटले जाते मात्र आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे, एका महिलेचा चक्क ज्युस पिल्याने मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेली महिला ९३ वर्षांची होती, तिने ज्यूस पिला आणि मृत्यू झाला असे तपासात आढळून आले आहे.

गर्ट्रूड एलिझाबेथ मुरिसन मॅक्सवेल नावाची वृद्ध महिला कॅलिफोर्निया येथील ‘एट्रिया पार्क सीनियर लिव्हिंग फॅसिलिटी’ येथे राहत होती. ती ९३ वर्षांची होती. तिने ज्युस पिल्याने तिचा मृत्यू झाला, हे समजल्यानंतर परिसरात खळबळ निर्माण झाली.

महिलेचा ज्युस पिल्याने मृत्यू झाला की अजून काही कारण आहे याचा पोलिस तपास करत आहेत. महिला स्वतः च्या हाताने खाऊ पिऊ शकत नव्हती त्यामुळे तिच्यासाठी एक केअरटेकर ठेवला होता. मात्र या केअरटेकरने तिला ज्युस ऐवजी वॉशिंग लिक्विड दिल्यामुळे तिचा मृत्यू झाला असा संशय व्यक्त केला जात आहे.

एलिझाबेथची मुलगी मार्सिया कुसिनने आपल्या आईच्या स्थितीबद्दल माहिती दिली आहे. मार्सिया म्हणाली की, तीची आई स्वतः काहीही खाऊ किंवा पिऊ शकत नव्हती. केअरटेकर तिला स्वतःच्या हाताने खाऊ घालायचे. एलिझाबेथच्या कुटुंबात ८ मुले आणि २० नातवंडे आहेत.

माहितीनुसार, केअर टेकरने त्यादिवशी तिच्या आईला द्राक्षांचा ज्युस दिला. त्यानंतर तिची प्रकृती खालावली. तिचं तोंड, घसा आणि तोंडातील घास पोटातील जठरापर्यत पोहोचवणाऱ्या ग्रासनलिकेत चट्टे पडले. त्यानंतर या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असे बोलले जात आहे.

खरं तर महिलेला केअर टेकरने जो ज्युस पाजला तो ज्युस नसून वॉशिंग लिक्विड होतं. त्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. स्थानिक अधिकारी देखील तपासात मदत करत आहेत. सध्या महिलेसोबत घडलेल्या या घटनेने खळबळ निर्माण झाली आहे.

इतर

Join WhatsApp

Join Now