मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर हिचा काल ३६ वा वाढदिवस झाला. तिच्या वाढदिवसानिमित्ताने चाहत्यांपासून सेलिब्रिटींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. या सगळ्यात सर्वांचे लक्ष गेलं ते म्हणजे तिचा कथित बॉयफ्रेंड निर्माता अनिश जोगने शेअर केलेल्या पोस्टकडे. सध्या त्या पोस्टची प्रचंड चर्चा आहे.
अनिशने त्याच्या इन्स्टग्राम अकाउंट वरून ही पोस्ट शेअर केली आहे. अनिशने सईचे काही फोटो घेत एक व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडीओला त्याने कॅप्शन दिले आहे. त्यात लिहिले की,’वाढदिवसाच्या शुभेच्छा मॅजिक! तू जग जिंकावे अशी माझी इच्छा आहे!’ या पोस्टवर सईने प्रतिक्रिया देत ‘लव्ह यू’ असे म्हंटले आहे.
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अनिश जोग आणि सई ताम्हणकर यांनी अनेक चित्रपट एकत्र केले आहेत.’धुरळा’, ‘YZ’, ‘टाइम प्लिज’ ‘गर्लफ्रेंड’ अशा अनेक चित्रपटांचा अनिश निर्माता आहे. सध्या सई आणि अनिश या दोघांच्या जोडीची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होते.
https://www.instagram.com/reel/CfMtHw4jLxH/?igshid=YmMyMTA2M2Y=
सईचे सोशल मीडियावरचे सुंदर फोटो अनेकांना भुरळ पाडत असतात. पण तुम्हाला हे माहीत आहे का की ती उत्तम कराटे खेळते. तिनं ऑरेंज बेल्ट मिळवलाय. एका मुलाखतीत सईनं सांगितलं होतं की, ती मार्शल आर्टही शिकली आहे. त्यामुळे पुढे एखाद्या अँक्शनपटात ती दिसली तर नवल नको वाटायला.
सई ताम्हणकर शाळेपासून मैदानी खेळ खेळायची. शाळेत असताना ती स्पोर्ट पर्सन म्हणूनच माहीत होती. ती कबड्डी चांगलं खेळायची. राज्य स्तरावर तिची ओळख कबड्डीपटू होती. याशिवाय सईला झोपायला देखील प्रचंड आवडते, ती एका वेळी २२ तास देखील झोपू शकते.
तिचा नुकताच मीडियम स्पायसी सिनेमा प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांना तो खूप आवडत आहे. सईनं आपल्या अभिनयाची छाप मराठी सिनेमात सोडलीच. शिवाय गजिनी, हंटर यांसारख्या बाॅलिवूड सिनेमांतही तिचा अभिनय कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहिला आहे.