Prajakta Mali : मराठमोळी सुंदर अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात कायम असते. ती आपल्या कामाचे अपडेट्स, ग्लॅमरस फोटो कायम सोशल मीडियावर पोस्ट करत असते. यावर चाहत्यांकडूनही मोठा प्रतिसाद तिला मिळतो. प्राजक्ता माळीचा फेसबुक, इन्स्टाग्रामवर मोठा चाहतावर्ग आहे.
प्राजक्ता माळीच्या सोशल मीडिया पोस्टला कायम चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळत असतो. तसेच तिच्या पोस्टवर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडतो. यामध्ये एका चाहत्याने तर चक्क प्राजक्ता माळीला सोशल मीडियावर प्रपोज केलं. त्यानंतर यावर प्राजक्ता माळीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र याबाबत सोशल मीडियावर चांगलेच चर्चा रंगत आहे.
प्राजक्ता माळीने नुकताच जांभळ्या रंगाच्या स्टायलिश ड्रेसमध्ये सुंदर फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्या फोटोवर चाहत्यांकडून तिला भरपूर कमेंट्स, लाईक मिळाले. त्यामध्येच एका चाहत्याने कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया दिली. त्याने सरळ आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.
‘महिला सशक्तीकरणाचं तू प्रतिक आहेस. तू मजबूत व्यक्तीमहत्त्व आहेस. तू म्हणजे महाराष्ट्राची परंपरा आणि ब्युटी क्वीन.. मी तुझ्यावर प्रेम करतो,’ अशा शब्दात त्या चाहत्याने प्राजक्ताला प्रपोज केल्याचे दिसते. एका चाहत्याने अशा प्रकारे सेलिब्रिटीला केलेल्या या ऑनलाइन प्रपोजची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे.
प्राजक्ता माळीने रुपेरी पडद्यावर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेने तिला मोठी लोकप्रियता मिळवून दिली. प्राजक्ता सध्या ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’मध्ये सूत्रसंचालन उत्तम प्रकारे करताना दिसते. प्राजक्ताने माळीने काही दिवसांपूर्वी ‘रानबाजार’ या वेब सिरीजमध्ये काम केले आहे.
त्या वेब सिरीजमुळे प्राजक्ता भलतीच चर्चेत आली होती. आता नव्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी ती काही दिवसांपूर्वी लंडनला जाऊन आली आहे. प्राजक्ता माळी तिच्या स्टायलिश लुकमुळे, सुंदर अभिनयामधून चाहत्यांना आकर्षित करते. प्राजक्ता माळी सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असल्याने तिच्या पोस्टबाबत चाहत्यांना मोठी उत्सुकता असते.
महत्वाच्या बातम्या-
politics : खुद्द उद्धव ठाकरे निवडणुकीला उभे राहिले तर त्यांनाही पाडील; भाजप नेत्याचं ठाकरेंना खुलं आव्हान
eknath shinde : …म्हणून शिवसेनेची जागा असूनही शिंदेंच्या गटाला मिळाली नाही अंधेरीची उमेदवारी
Amit Thackeray : ….नाहीतर मी राजकारणात आलोच नसतो; अमित राज ठाकरे असं का म्हणाले