उस्मानाबाद म्हंटलं की, कमी पाण्याचा पट्टा, असं संबोधलं जातं. मात्र आता याच भागातील तरुणांनी एक प्रयोग यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे. उस्मानाबाद मधील जागजी गावातील बंधुंनी माळरानावरील शेतात नवनवे प्रयोग केले आहेत. जिल्ह्यात सध्या या सख्ख्या भवांचीच चर्चा सुरू आहे.
ड्रॅगनफ्रुट, सफरचंद, खजूर शेतीचा प्रयोग सख्ख्या भावांनी केला आहे. ड्रॅगनफ्रुटमध्ये यश मिळवल्यानंतर त्यांनी सफरचंद शेतीचा प्रयोग सुरु केला आहे. अभिमानाची बाब म्हणजे, जागजी येथील सावंत बंधुंनी त्यांच्या शेतात ड्रॅगनफ्रुट शेतीतून लाखोंचे उत्पन्न मिळवलं.
मिळालेल्या माहितीनुसार, सावंत बंधुंनी त्यांच्या शेतात ८ एकरावर ड्रॅगनफ्रुट, १ एकरवर सफरचंद, १ एकरवर खजूरच्या रोपांची लागवड केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सावंत बंधुंनी जत येथून ड्रॅगनफ्रुटची १६०० रोप आणली आणि ८ एकरवर शेतावर लावली.
दरम्यान, आजच्या भावानुसार त्यांना फळ विक्रीतून सावंत बंधुंना वर्षाला २४ लाखाचे उत्पन्न मिळतं आहे. सातारा येथे नितीन सावंत हे महाविद्यालयात शिक्षक आहेत. मात्र शेतीची आवड असल्यामुळे शेती मध्ये ते असे वेगवेगळे प्रयोग करतात. ड्रॅगनफ्रुट सोबत या बंधूंनी सफरचंद लागवडीचा प्रयोग केला आहे.
विशेष बाब म्हणजे, आपल्या शेतात सावंत यांनी खजूर शेतीचा देखील प्रयोग केला आहे. राजस्थान येथील कच्छ येथून बीएस सुपर या जातीची २२० रोपे सावंत यांनी आणली. सध्या जिल्ह्यात या दोन्ही भावांची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक जण त्यांच्याकडे माहिती घेण्यासाठी येत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या