सध्या अभिनेत्री केतकी चितळे चांगलीच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत फेबसूकवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. अनेकांनी तिला कडाडून विरोध केला आहे. केतकी चितळेच्या पोस्टवर अनेकांनी संतापही व्यक्त केला आहे.
राजकीय वर्तुळातही या प्रकरणावरून वातावरण तापलेले आहे. अनेक नेत्यांनी तिच्या पोस्टला विरोध केला आहे. असे असताना केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. काल केतकी चितळेला कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी कोर्टाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
विशेष बाब म्हणजे कोर्टात केतकीने वकील घेतला नाही, तिनं स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. यावेळी ‘माझी पोस्ट डिलिट करणार नाही,’ असं पुन्हा केतकीने कोर्टात ठामपणे सांगितलं. तर आता याच प्रकरणावर अभिनेत्री सविता मालपेकर या व्यक्त झाल्या आहे. सविता यांनी थेट केतकीला झापले आहे.
अभिनेत्री केतकी चितळे हिने आदरणीय खासदार शरद पवार साहेब यांच्याबाबत फेसबुकवर केलेल्या वादग्रस्त पोस्टचे पडसाद सर्व स्तरातून उमटले आहेत. #NCP pic.twitter.com/1tB1RdWTir
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) May 16, 2022
या प्रकरणावर बोलताना त्या म्हणतात, ”कोण आहे ती केतकी? काय लायकी तिची?’, जे बोलली आहेस ते शब्द जर मागे घेतले नाहीस आणि पवार साहेबांची माफी मागितली नाहीस तर तू जिथे कुठे असशील तिथून तुला शोधून पवार साहेबांच्या पायापर्यंत आणलं नाही ना तर नावाची सविता मालपेकर नाही. लक्षात ठेव, असं म्हणत त्यांनी केतकीला झापले आहे.
दरम्यान, ‘एखाद- दुसऱ्या मालिकेत काम केलं आणि मिळालेलं कामही टिकवता आलं नाही अशा मुलीने असं बोलावं. केतकी तू कोणत्या माणसाविषयी बोलतेस.. त्यांचं हिमालयाएवढं कतृत्व आहे. तू क्षुद्र आहेस तुझी लायकीही नाहीये,’ अशा जहरी शब्दात सविता मालपेकर यांनी केतकीची कानउघडणी केली आहे.
तसेच पुढे त्या म्हणतात, ‘तुझ्यावर जेव्हा अन्याय झाला तेव्हा मी तुला पाठिशी घातलं होतं आणि तू चुकीची वागलीस तर मी तुला शिक्षाही करू शकते, असंही सविता मालपेकर यांनी म्हंटलं आहे. सध्या केतकी प्रकरण चांगलच तापलं असून सर्व क्षेत्रातून तिच्यावर टीकेचा भडीमार होतं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
‘काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?; कॉंग्रेसच्या राज्यातील सर्वात मोठ्या नेत्याचा गौप्यस्फोट
शरद पवार देशात तिसरी आघाडी उभी करणार! नेतृत्व महाराष्ट्राकडे; वळसे पाटलांच्या संकेतांनी राजकारणात खळबळ
मृत्यूनंतर तब्बल ‘एवढी’ संपत्ती कुटुंबासाठी मागे सोडून गेले यूएईचे अध्यक्ष शेख खलिफा, वाचून अवाक व्हाल
मेव्हण्याचे केले ३१ तुकडे, मग बदला घेण्यासाठी आरोपीच्या भावावर झाडल्या ३१ गोळ्या, घटनेने शहर हादरले