Share

‘कोण आहे ती केतकी? काय लायकी तिची?’ केतकी चितळे प्रकरणावर जेष्ठ अभिनेत्रीची संतप्त प्रतिक्रिया

ketaki chitale

सध्या अभिनेत्री केतकी चितळे चांगलीच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत फेबसूकवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. अनेकांनी तिला कडाडून विरोध केला आहे. केतकी चितळेच्या पोस्टवर अनेकांनी संतापही व्यक्त केला आहे.

राजकीय वर्तुळातही या प्रकरणावरून वातावरण तापलेले आहे. अनेक नेत्यांनी तिच्या पोस्टला विरोध केला आहे.  असे असताना केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. काल केतकी चितळेला कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी कोर्टाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

विशेष बाब म्हणजे कोर्टात केतकीने वकील घेतला नाही, तिनं स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. यावेळी ‘माझी पोस्ट डिलिट करणार नाही,’ असं पुन्हा केतकीने कोर्टात ठामपणे सांगितलं. तर आता याच प्रकरणावर अभिनेत्री सविता मालपेकर या व्यक्त झाल्या आहे. सविता यांनी थेट केतकीला झापले आहे.

या प्रकरणावर बोलताना त्या म्हणतात, ”कोण आहे ती केतकी? काय लायकी तिची?’, जे बोलली आहेस ते शब्द जर मागे घेतले नाहीस आणि पवार साहेबांची माफी मागितली नाहीस तर तू जिथे कुठे असशील तिथून तुला शोधून पवार साहेबांच्या पायापर्यंत आणलं नाही ना तर नावाची सविता मालपेकर नाही. लक्षात ठेव, असं म्हणत त्यांनी केतकीला झापले आहे.

दरम्यान, ‘एखाद- दुसऱ्या मालिकेत काम केलं आणि मिळालेलं कामही टिकवता आलं नाही अशा मुलीने असं बोलावं. केतकी तू कोणत्या माणसाविषयी बोलतेस.. त्यांचं हिमालयाएवढं कतृत्व आहे. तू क्षुद्र आहेस तुझी लायकीही नाहीये,’ अशा जहरी शब्दात सविता मालपेकर यांनी केतकीची कानउघडणी केली आहे.

तसेच पुढे त्या म्हणतात, ‘तुझ्यावर जेव्हा अन्याय झाला तेव्हा मी तुला पाठिशी घातलं होतं आणि तू चुकीची वागलीस तर मी तुला शिक्षाही करू शकते, असंही सविता मालपेकर यांनी म्हंटलं आहे. सध्या केतकी प्रकरण चांगलच तापलं असून सर्व क्षेत्रातून तिच्यावर टीकेचा भडीमार होतं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेणाऱ्या ओवैसींचं अभिनेत्री रवीना टंडनकडून समर्थन? ट्वीट तुफान व्हायरल
मित्राच्या लग्नात पत्नीसोबत डॅशिंग अंदाजात पोहोचला KGF स्टार यश, पहा जबरदस्त फोटो
‘लक्षात ठेव, तुला पवार साहेबांच्या पायापर्यंत आणलं नाही ना तर..; जेष्ठ अभिनेत्रीने केतकीला झाप झाप झापले
अरे वा! घरातील गरम हवा बाहेर काढण्यासाठी केला भन्नाट जुगाड, उन्हाळ्यातही येते थंडगार हवा

इतर ताज्या बातम्या मनोरंजन राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now