Share

सौदी अरेबियाच्या नागरिकांना भारतात प्रवासाला बंदी, इतर १५ देशांबाबतही घेतला मोठा निर्णय

सध्या सौदी अरेबियामध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाने आपल्या नागरिकांच्या परदेश प्रवासावर बंदी घातली आहे. सौदी अरेबियाने(Saudi Arebia) एकूण सोळा देशांमध्ये प्रवासाला बंदी घातली आहे. या देशांमध्ये भारताचा देखील समावेश आहे. सौदी अरेबिया सरकारच्या पासपोर्ट महासंचालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे.(Saudi nationals banned from traveling to India)

सौदी अरेबियाने आपल्या नागरिकांना भारताशिवाय लेबनॉन, सीरिया, तुर्की, इराण, अफगाणिस्तान, येमेन, सोमालिया, इथोपिया, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, लिबिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम, आम्रेनिया, बेलारूस आणि व्हेनेझुएला या देशांमध्ये प्रवासाला बंदी घातली आहे. पण भारतीय नागरिकांना सौदी अरेबियामध्ये प्रवास करण्यास बंदी घातल्याची अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.

सध्या कोरोना मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. उत्तर कोरियासह इतर देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शनिवारी सौदी अरेबियामध्ये कोरोना विषाणूचे ४१४ नवीन रुग्ण आढळले आहेत. सौदी अरेबियाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण ७,६२,५७५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

आतापर्यंत सौदी अरेबियामध्ये ९१२८ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या ८१ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सौदी अरेबियाच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. सौदी अरेबियामध्ये गेल्या २४ तासांत ४७४ लोक कोरोनापासून मुक्त झाले आहेत. सौदी अरेबियामध्ये सध्या ६४४८ सक्रिय रुग्ण आहेत.

सध्या सौदी अरेबिया सरकाराने सुरक्षेच्या कारणास्तव १६ देशांमध्ये आपल्या नागरिकांना प्रवास करण्यास बंदी घातली आहे. सौदी अरेबियाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळलेला नाही. प्रतिबंधात्मक आरोग्याचे उप-आरोग्य मंत्री अब्दुल्ला असिरी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

मंकीपॉक्सची प्रकरणे शोधून काढण्याची आणि एखादा रुग्ण आढळल्यास या संसर्गाशी लढण्याची क्षमता सौदी अरेबियामध्ये आहे, असे उप-आरोग्य मंत्री अब्दुल्ला असिरी यांनी सांगितले आहे. सध्या जगातील ११ देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून आले आहेत. डब्ल्यूएचओ सध्या संसर्ग पसरण्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

महत्वाच्या बातम्या :-
‘तो’ जोरजोरात किस करत होता.. दिपीका हात हटवत होती; पहा कान्सच्या रेड कार्पेटवरचा तो व्हायरल व्हिडीओ
इंग्रजांच्या काळातील ‘या’ निर्णयामुळे ज्ञानवापी केसला नवे वळण, हिंदू संघटनांनी केला मोठा दावा
‘मराठा आरक्षणाबाबत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या छत्रपतींना पक्षात येण्याची अट कशासाठी?’ मनसेचा संतप्त सवाल

ताज्या बातम्या आंतरराष्ट्रीय

Join WhatsApp

Join Now